शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचा ‘बेपत्ता’ तरुण पाक लष्कराच्या ताब्यात

By admin | Updated: January 15, 2016 04:23 IST

‘बेपत्ता’ झालेला आपला मुलगा जिवंत असून, तो पाकिस्तान लष्कराच्या ताब्यात आहे, अशी माहिती मिळाल्याने गेली तीन वर्षे हवालदिल झालेल्या मुंबईतील अन्सारी दाम्पत्याला

- डिप्पी वांकाणी,  मुंबई

‘बेपत्ता’ झालेला आपला मुलगा जिवंत असून, तो पाकिस्तान लष्कराच्या ताब्यात आहे, अशी माहिती मिळाल्याने गेली तीन वर्षे हवालदिल झालेल्या मुंबईतील अन्सारी दाम्पत्याला बुधवारी थोडा दिलासा मिळाला. हमीद या मुलाचा शोध घेण्यासाठी या दाम्पत्याने पेशावर उच्च न्यायालयात ‘हेबियस कॉर्पस्’ याचिका केली आहे. ‘हमीद हा आमच्या कोठडीत असून, त्याच्यावर लष्करी न्यायालयात खटला सुरू आहे,’ असे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या वकिलाने या याचिकेवरील सुनावणीत बुधवारी सांगितले.‘हमीद अन्सारी हा मुंबईतून एमबीए शिकलेला आहे. २०१२मध्ये तो अफगाणिस्तानातून पाकिस्तानात गुपचूप गेला व त्यानंतर तो बेपत्ता झाला. आमचा मुलगा किमान जिवंत असल्याचे ऐेकून आम्हाला आनंद झाला,’ असे अन्सारी दाम्पत्याने सांगितले. ‘पाकिस्तानला जाण्यासाठी आम्हाला आतापर्यंत नाकारण्यात आलेला व्हिसा आता दिला जावा, म्हणजे आम्ही त्याला भेटू शकू,’ असे ते म्हणाले.

मुलाखतीसाठी सांगून गेला...‘४ नोव्हेंबर २०१२ रोजी हमीद आम्हाला अफगाणिस्तानात विमानसेवेशी संबंधित कंपन्यांमध्ये थेट मुलाखती (वॉक इन इंटरव्ह्यूज) असल्याचे व मला त्या द्यायच्या आहेत, असे सांगून गेला. मी अनुभव घेऊन पाच ते सहा महिन्यांत परत येईन आणि नंतर नोकरीसाठी भारतात अर्ज करीन, असे तो म्हणाला होता. १० नोव्हेंबरपर्यंत तो आमच्या संपर्कात होता व त्यानंतर तो बेपत्ता झाला,’ असे त्याची आई फौजिया अन्सारी यांनी सांगितले. फौजिया अन्सारी प्राध्यापक आहेत.

आदिवासी मुलीशी प्रेमसंबंध...फौजिया अन्सारी म्हणाल्या की,‘आम्ही त्याच्याशी संपर्क साधू न शकल्यामुळे आम्ही त्याचे फेसबुक अकाउंट उघडले आणि तो ४ ते ५ पाकिस्तानींच्या संपर्कात असल्याचे आमच्या लक्षात आले. तो त्यांच्याशी निमबज्ज मेसेंजरवर चॅटिंगही करायचा. त्याचे पाकिस्तानातील जिरगा येथे आदिवासी मुलीशी प्रेमसंबंधही असावेत, असा आमचा संशय आहे व तिच्या पालकांनी त्याला मान्यता दिली नाही. तेथील वनी परंपरेनुसार मुलीच्या कुटुंबाचा ज्या कुटुंबाशी वाद आहे, तो मिटविण्यासाठी त्या कुटुंबात तिचा विवाह केला जातो. हमीदने आम्हाला कधीही त्या मुलीबद्दल सांगितले नाही. आमच्याशी त्याच्या झालेल्या संभाषणातून त्या मुलीची तेथून सुटका करून तिच्याशी त्याला लग्न करायचे आहे, असा संशय आम्हाला आला,’ असे फौजिया अन्सारी म्हणाल्या.फौजिया अन्सारी म्हणाल्या की,‘हमीद आमचे मित्र ग्राफिक डिझायनर अत्ताऊर रहमान, डॉ. शाझिया खान आणि एमबीए झालेले अब्दुल्ला आणि हुमारिया यांच्या संपर्कात होता. या लोकांनी त्याला काळजी करू नकोस, पाकिस्तानात जा, असे सांगून तुला काहीही होणार नाही, असे आश्वासन दिले होते.’अनेकदा व्हिसा नाकारला...‘हमीद बेपत्ता असल्याची तक्रार आम्ही वर्सोव्यात दाखल केली आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांना आणि अफगाणिस्तानचा दूतावास व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनाही पत्र लिहिले. त्याला शोधून काढू शकतील, अशा होईल तेवढ्या संस्थांना आम्ही पत्रे लिहिली होती. त्या प्रयत्नांतून आमचा संपर्क पाकिस्तानातील स्थानिक वार्ताहर झीनत शहझादी यांच्याशी झाला आणि त्यांनी त्या मुलीचे वडील, तिच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि इतरांशी बोलून आम्हाला मदत केली. शहझादी यांनी आम्हाला तिच्या वडिलांनी तिचे लग्न करून टाकल्याचे सांगितले. तिकडे जाण्यासाठी आम्ही अनेक वेळा व्हिसासाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आला,’ असे फौजिया म्हणाल्या.‘झीनत शहझादी यांनी चौकशी केली आणि हमीद अत्ता ऊर रहमान यांच्यासोबत दोन दिवस राहिल्याचे त्यात स्पष्ट झाले. पाकिस्तानच्या गुप्तचर खात्याने कोहट येथील हॉटेलमधून हमीदला अटक केल्याचेही झीनत यांना आढळले. आम्हाला रहमानने हमीदकडील पैसे घेऊन पोलिसांना कळविले असावे, असा संशय आहे.’२० लाखांहून अधिक खर्च...हमीदचे वडील निहाल अन्सारी म्हणाले की, ‘पाकिस्तानातील रोटरी क्लबचे सदस्य अदनान रोहेल्ला यांच्याशी झीनतचा संपर्क करून देण्यात आला व अदनान यांनी हमीदच्या फेसबुक अकाउंटवर फ्रेंडस् रिक्वेस्ट पाठविली. आम्ही त्यांना (अदनान रोहेल्ला) सर्वकाही खुलासा करून सांगितले व त्यांच्या सूचनेवरून गेल्या वर्षी एक एप्रिल रोजी हेबियस कॉर्पस अर्ज दाखल केला. आमच्यासाठी धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या वर्षी आॅगस्टपासून झीनत शहझादीच बेपत्ता आहेत. त्यांचेही अपहरण झाल्याची भीती आम्हाला वाटत आहे. प्रसार माध्यमात आलेल्या वृत्तांवरून हमीदवर तेथील लष्करी न्यायालयात खटला सुरू असल्याचे आम्हाला समजले,’ असेही निहाल अन्सारी म्हणाले. ‘या सगळ््या प्रकरणात आम्ही २० लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केले. हमीद सुटून यावा, अशी आम्हाला आशा आहे. झीनतबद्दलही आम्हाला काळजी वाटते. त्या सापडतील अशी आशा आहे. आम्ही दोन्ही सरकारांना यात हस्तक्षेप करून हमीदला सोडून देण्याचे आवाहन करतो,’ असे निहाल आणि फौजिया अन्सारी यांनी केले.