शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या किमान तापमानात वाढ!

By admin | Updated: December 20, 2015 00:58 IST

राज्यात थंडीचा कडाका वाढतच असून, शनिवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे १० अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे, तर शनिवारी मुंबईच्या किमान तापमानात

मुंबई : राज्यात थंडीचा कडाका वाढतच असून, शनिवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे १० अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे, तर शनिवारी मुंबईच्या किमान तापमानात ३ अंशाची वाढ नोंदविण्यात आली आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी मुंबईचे किमान तापमान अनुक्रमे १५, १४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले होते. दुसरीकडे २१ डिसेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईवर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. परिणामी, शहराच्या किमान तापमानात वाढ नोंदविण्यात आली होती. मात्र, ढगाळ वातावरण विरून गेल्यानंतर, मुंबईच्या किमान तापमानात पुन्हा घट नोंदविण्यात आली. राज्यातही सर्वसाधारण हीच परिस्थिती पाहण्यास मिळाली. देशाच्या ईशान्यसह उत्तरेकडून दक्षिणकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यातील प्रमुख शहरांच्या किमान तापमानात चढ-उतार नोंदविण्यात येऊ लागले. गेल्या २४ तासांत कोकणाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये...पुणे १४, अहमदनगर १३.४, जळगाव १२, महाबळेश्वर १५.५, मालेगाव १२.४, नाशिक ११.५, उस्मानाबाद १५.३, औरंगाबाद १४.९, परभणी १६.१, नांदेड १४.५अकोला १४.२, अमरावती १३.२, बुलढाणा १४.६, नागपूर ११.३, वर्धा १३.५, यवतमाळ १५.