मुंबई : येत्या ४८ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून, उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील, असा अंदाजही व्यक्त केला. तर वातावरणातील बदलामुळे २० अंशावर पोहोचलेल्या मुंबईच्या किमान तापमानात ५ अंशाची घट नोंद झाली असून, सोमवारी शहराचे किमान तापमान १४ अंश नोंद झाले.मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या संचालिका शुभांगी भुते म्हणाल्या, राजस्थानमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्स निर्माण झाले. यामुळे पूर्वेसह उत्तरेकडील थंड हवा दक्षिणेकडे वाहू लागली आहे. परिणामी, राज्यातील किमान तापमान पुन्हा घसरले आहे. तर लक्षद्वीपपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत द्रोणीय स्थिती निर्माण झाली. शिवाय जमिनीपासून दोन ते अडीच किलोमीटरवर चक्रवात निर्माण झाले आहे. परिणामी म्हणून किंचितसा पाऊस पडेल. भारतीय हवामान शास्त्र विभागानुसार, गेल्या २४ तासांत राज्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट, तर विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय वाढ झाली. तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ तर राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंद झाले. (प्रतिनिधी)
मुंबईचे किमान तापमान घसरले
By admin | Updated: February 10, 2015 02:38 IST