ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी रेल्वे पुन्हा एकदा 'डेथ लाईन' ठरली असून बुधवारी रेल्वे अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दिवसभरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये १५ रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये १४ पुरूष व एका महिलेचा समावेश आहे.
दरम्यान गेल्याच आठवड्यात (शनिवार ३ सप्टेंबर) रेल्वे अपघातात एकाच दिवशी १८ प्रवासी रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडले होते. एकाच दिवशी 18 प्रवाशांना जीव गमावल्याचा हा उच्चांक होता. तर काल झालेल्या अपघातात १५ जणांना जीव गमवावा लागला.
यावर्षी जानेवारीपासून ते ऑगस्टपर्यंत एकूण 2000 रेल्वे प्रवाशांचा अपघातात मृत्यू झाला आहे. यामध्ये रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना अपघात होऊन मृत्यू झालेल्याचं प्रमाण जास्त आहे.