शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

मुंबईतील घरे स्वस्त होणे अशक्य !

By admin | Updated: March 30, 2015 02:48 IST

नव्या प्रस्तावित विकास आराखड्यात अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दिल्याने घरे स्वस्त होतील, असा दावा महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडून केला जात

संदिप प्रधान, मुंबईनव्या प्रस्तावित विकास आराखड्यात अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दिल्याने घरे स्वस्त होतील, असा दावा महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात ते अशक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.प्रस्तावित विकास आराखड्याविषयी महापालिका आयुक्तांनी सादरीकरण केले. मात्र रेडी रेकनरच्या दराच्या ७५ टक्के आणि १०० टक्के प्रिमीयमची रक्कम भरून एफएसआय खरेदी करण्याची असलेली तरतूद आणि बाजारातून विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) खरेदी करून वापरण्याची मुभा यामुळे यापुढे बृहन्मुंबईत सरसकट ५० मजल्यांपेक्षा जास्त उंचीच्या इमारती उभ्या राहतील व त्या इमारतींमधील घरे स्वस्त असणार नाहीत, असे मत शिवसेनेच्या आमदारांनी सादरीकरणा दरम्यान नोंदवले.सध्या मुंबईतील दरडोई वापरले गेलेले बांधीव क्षेत्र सरासरी ९ चौ.मी. आहे. २०३४ सालापर्यंत आर्थिक संपन्नतेमुळे हे दरडोई वापरले गेलेले बांधीव क्षेत्र सरासरी २७ चौ.मी. असेल, असा विकास आराखड्यातील अंदाज आहे. ४५८ चौ.कि.मी. क्षेत्रफळाच्या बृहन्मुंबईतील १४० चौ.कि.मी. जमिनीचाच केवळ बांधकामाकरिता वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे १ कोटी ४० लाख अंदाजित लोकसंख्येकरिता ४४० चौ.कि.मी. बांधीव क्षेत्राची गरज असेल. त्यामुळे आकाशाला गवसणी घालणारे टॉवर बांधणे अपरिहार्य असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. याकरिता सरसकट बृहन्मुंबईत ३.१५ एवढा एफएसआय देणे गरजेचे आहे. बेकायदा बांधकामांची कबुलीबृहन्मुंबईचा पहिला विकास आराखडा १९६६-६७ साली दहा वर्षांकरिता तयार केला गेला. त्यानंतर दुसरा विकास आराखडा १९७६ मध्ये अमलात यायला हवा होता. मात्र विकास आराखड्याचे प्रारुप १९८४ साली प्रसिद्ध झाले. लोकांकडून हरकती व सूचना मागवण्यास १९८९ साल उजाडले. सरकारने १९९१ ते ९४ या कालावधीत टप्प्याटप्प्याने या विकास आराखड्याला मंजुरी दिली गेली. याचा अर्थ तब्बल १५ वर्षे देशाच्या आर्थिक राजधानीला विकास आराखडा नव्हता. १९९१ च्या या विकास आराखड्यातील केवळ ३५ टक्के आरक्षणे अमलात आली. उर्वरित ६५ टक्के आरक्षणे आता नव्या आराखड्यात रद्द केली आहेत. आता या जमिनीवर झोपड्या व बेकायदा बांधकामे उभी राहिल्याची कबुली आराखड्यात दिलेली आहे.मोकळ््या जागांचे दिवास्वप्नबृहन्मुंबईतील दरडोई मोकळी जागा १.०९ चौ.मी. आहे. देशाच्या राजधानीत ती ४.५ चौ.मी. आहे. प्रस्तावित विकास आराखड्यात ती २ चौ.मी. करण्याचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. याकरिता १४ चौ.कि.मी. अतिरिक्त मोकळी जागा उपलब्ध करावी लागेल. पर्यावरणवाद्यांनी मुंबईत दरडोई ६ चौ.मी. मोकळी जागा उपलब्ध करून देण्याचा आग्रह धरला आहे. ही मागणी स्वीकारायची झाली तर बांधकामास उपलब्ध १४० चौ.कि.मी. जमिनीपैकी ५६ चौ.कि.मी. जमीन मोकळी ठेवावी लागेल. एवढ्या मोठ्या जमिनीवरील ५८ लाख लोकांचे पुनर्वसन करणे अशक्य असल्याचे महापालिका आयुक्त सीताराम कुंटेंनी सांगितले.