शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचा ‘डीपी’ पुन्हा लांबणीवर

By admin | Updated: May 9, 2017 02:37 IST

मुंबईच्या सुधारित विकास आराखड्याचे वाचन अद्याप अनेक नगरसेवकांनी केलेले नसल्याने या आराखड्याच्या मसुद्याचा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईच्या सुधारित विकास आराखड्याचे वाचन अद्याप अनेक नगरसेवकांनी केलेले नसल्याने या आराखड्याच्या मसुद्याचा अभ्यास करण्यासाठी आणखी दोन महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या महासभेत घेण्यात आला. आतापर्यंत तीनवेळा ही मुदत वाढवून देण्यात आल्याने विकास आराखडा लांबणीवर पडत चालला आहे. मुदतवाढ मंजूर झाल्यामुळे आता १९ जुलैपर्यंत या आराखड्याची मंजुरी लांबणीवर पडली आहे.मुंबईच्या नियोजनबद्ध विकासासाठी प्रस्तावित असलेला सन २०१४-२०३४ या २० वर्षांचा विकास आराखडा गेली दोन वर्षे रखडला आहे. या आराखड्याच्या मसुद्यामधील अनेक शिफारशींवर सर्वच स्तरांतून तीव्र पडसाद उमटले. यामध्ये परवडणारी घरे, आरे कॉलनीतील ना विकास क्षेत्र खुले करणे, कोळीवाडे व गावठाणांची दखल न घेणे अशा काही वादग्रस्त मुद्द्यांचा समावेश होता. या मसुद्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्यानंतर सुधारित मसुदा तयार करण्यात आला. त्यावर विविध बिगर शासकीय संस्था, नागरिकांकडून जवळपास १२ हजार सूचना व हरकती पालिकेला प्राप्त झाल्या. निवडणुकीच्या काळात या अहवलावरून नवा वाद उभा राहण्याची शक्यता असल्याने सत्ताधारी पक्षांनी हा अहवाल लांबणीवर टाकला होता. हा अहवाल मंजूर होऊन राज्य सरकारकडे पाठविण्याची अंतिम मुदत २० मार्च २०१७ पर्यंत होती. ती वाढवून १९ मे करण्यात आली होती.त्यानुसार या मुदतवाढीची वेळ संपण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. मात्र विकास आराखड्याचा मसुदा ३ मे रोजी हाती पडल्याची तक्रार अनेक नगरसेवकांनी केली. त्यामुळे मसुद्याला आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्याची उपसूचना सभागृह नेते यशवंत जाधव यांनी पालिकेच्या महासभेत केली. तर मसुद्यातील मुद्दे नगरसेवकांना समजावण्यासाठी तज्ज्ञांची नेमणूक करावी, अशी सूचना भाजपने केली. ती मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे १९ जुलैपर्यंतची मुदत नगरसेवकांना मिळाली आहे.