शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

मुंबईतील इमारतींचा पुनर्विकास होणार ठप्प

By admin | Updated: June 8, 2015 03:18 IST

इमारतींचा पुनर्विकास करताना दोन चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) लागू होईल, या सरकारी आदेशामुळे त्यापेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यालगतच्या इमारतींचा पुनर्विकास ठप्प झाला आहे.

संदीप प्रधान, मुंबईबृहन्मुंबईतील १८ मीटर व त्यापेक्षा अधिक रुंद रस्त्यालगत असलेल्या इमारतींचाच पुनर्विकास करताना दोन चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) लागू होईल, या सरकारी आदेशामुळे त्यापेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यालगतच्या इमारतींचा पुनर्विकास ठप्प झाला आहे. आतापर्यंत सरसकट २ एफएसआय लागू केला जात होता. सरकारच्या आदेशाच्या विरोधात बिल्डर, रहिवासी यांनी २४ हजार आक्षेप नोंदवले आहेत.बृहन्मुंबईचा नवा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर २०१४ ते २०३४ पर्यंत लागू होणारी विकास नियंत्रण नियमावली तयार करण्याचे काम सुरू आहे. सध्या १९९१ च्या विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार बांधकामांना मंजुरी दिली जाते. त्यानुसार बृहन्मुंबईत पुनर्विकास होणाऱ्या इमारतींना एक एफएसआय वापरला, तर एक विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) म्हणजे दोन एफएसआय वापरण्याची परवानगी होती. सरकारने काढलेल्या नव्या आदेशानुसार ९ ते १२ मीटर रुंदीच्या रस्त्यांकरिता एक एफएसआय वापरल्यावर ०.५० टीडीआर म्हणजे १.५० एफएसआय वापरण्यात येईल. १२ ते १८ मीटर रुंदीच्या रस्त्यांकरिता एक एफएसआय वापरल्यावर ०.७५ टीडीआर म्हणजे १.७५ एफएसआय वापरण्यात येईल. १८ ते २४ मीटर रुंदीच्या रस्त्यांकरिता एकूण दोन एफएसआय, २४ ते ३० मीटर रुंदीच्या रस्त्यांकरिता एकूण २.२५ एफएसआय वापरण्यात येईल. ३० मीटर पेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यांकरिता एकूण २.५० एफएसआय वापरण्यात येईल. विशेष म्हणजे नवीन विकास नियंत्रण नियमावली अमलात येईपर्यंत सध्याच्या नियमावलीनुसार बांधकाम करतानाही याच सूत्रानुसार टीडीआर वापरता येईल, असे आदेशात नमूद केले आहे. बृहन्मुंबईत १८ मीटर (६० फूट) रुंदीच्या रस्त्यांची संख्या कमी असून बहुतांश रस्ते अरुंद आहेत. गिरगाव, काळबादेवी, दादर, माटुंगा, शीव, घाटकोपर, विलेपार्ले अशा अनेक भागातील ३० ते ४० वर्षांपूर्वीच्या इमारतींच्या पुनर्विकासाचे प्रस्ताव या निर्णयामुळे ठप्प झाले आहेत. एफएसआय ०.२५ ते ०.५० इतका कमी झाल्याने दीर्घकाळ रहिवाशांबरोबर वाटाघाटी करून मूळ रहिवाशांना द्यायच्या सदनिकांचे क्षेत्रफळ निश्चित केल्यानंतर आता अचानक एफएसआय घटल्यामुळे छोट्या सदनिका घेण्यास रहिवाशी तयार होत नाहीत. ज्या छोट्या शहरांत टीडीआर लागू नाही तेथे रस्त्यांच्या रुंदीनुसार टीडीआर वापराचे नियम लागू करणे योग्य आहे, असे बांधकाम क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.