शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांची गर्दी, उद्योजकांची रीघ

By admin | Updated: February 14, 2016 01:57 IST

वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानाचा परिसर शनिवारी मेक इन इंडिया सप्ताहामुळे अक्षरश: मंतरला होता. मेक इन इंडिया सेंटरकवर सकाळपासूनच सहभागी कंपन्यांच्या प्रतिनिधींची

- गौरीशंकर घाळे,  मुंबई

वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानाचा परिसर शनिवारी मेक इन इंडिया सप्ताहामुळे अक्षरश: मंतरला होता. मेक इन इंडिया सेंटरकवर सकाळपासूनच सहभागी कंपन्यांच्या प्रतिनिधींची लगबग सुरु होती. सेंटरकडे येणा-या प्रत्येक रस्त्यावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती. तर, झेब्रा क्रॉसिंगपासून लेन मार्किंगसह प्रत्येक रस्ता देशीविदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी सुसज्ज होता.मेक इन इंडिया सेंटरवरील २५ भव्य दालनांत विविध क्षेत्रांतील उद्योजकांनी नावीन्यपूर्ण उत्पादनांचे सादरीकरण केले आहे. भारत इलेक्ट्रिकल्स, जेसीबी, इन्फोसिस, युफ्लेक्?स, ओएनजीसी, इन्स्टिट्यूट आॅफ कंपनी सेक्रेटरी यांनी प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. वेगवेगळ्या राज्यांनी दालने थाटली आहेत. गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा या राज्यांच्या दालनांत औद्योगिक प्रगतीचा आढावा घेतला आहे. विस्तीर्ण मैदानावर पसरलेल्या स्टॉलना भेटी देणे शक्य व्हावे म्हणून ई-वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. तब्बल ५० पर्यावरणपूरक ई-वाहने आणि ई-रिक्षा सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. मेक इन इंडिया सेंटरवर पुढील आठवडाभर विविध राज्यांच्या परंपरांचे दर्शन होणार आहे. शनिवारी पंजाबच्या कलाकारांनी भांगडा, ओडिशाच्या कलाकारांनी बिदई नृत्याविष्कार सादर केले. पारंपारिक वेशभूषेती कलाकार उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. सेटंरच्या उद्धघाटनासाठी पंतप्रधान येणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला होता. भारत नगरपासून ‘एनएसई’मार्गे अंतर्गत मार्गावरुन वाहतूक वळवण्यात आली. बीकेसीतील अग्निशमन दल केंद्राच्या मागील बाजूस पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सेंटरपासून ही जागा दूर असल्याने पाहुण्यांना भरउन्हात पायपीट करावी लागली. मेक इन इंडिया सेंटरमध्ये प्रवेश देण्यावरुन दुपारपर्यंत गोंधळाची स्थिती होती. पंतप्रधांनांच्या सुरक्षाव्यवस्थेमुळे प्रवेशपत्र असूनही प्रवेश नाकारला जात होता. विविध यंत्रणातील समन्वयाचा अभाव प्रकर्शाने जाणवत होता. दुपारपासूनच लोकांनी गर्दी केल्याने गेट नंबर ३ वरील रांग एक किलोमीटरपर्यंत लांबली होती. भर उन्हातही लोकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. गैरसोय झाली तरी काही हरकत नाही, देशासाठी महत्वाचा कार्यक्रम आहे. पहिला दिवस आहे, सुधारणा होईल, अशी भावना उपस्थितांमधून व्यक्त होत होती. मोदींच्या हस्ते उद्घाटनदेशातील परकीय गुंतवणूक वाढावी आणि उद्योग क्षेत्राला नवी झळाळी देण्याच्या उद्देशाने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या मेक इन इंडिया सप्ताहाच्या ‘मेक इन इंडिया सेंटर’चे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलात झालेल्या या सोहळ्यास पोलँड, फिनलँड आदी देशांच्या पंतप्रधानांसह जगभरातील मान्यवर उद्योजकांनी उपस्थिती लावली.मोदी सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून मेक इन इंडियाकडे पाहिले जाते. मेक इन इंडिया सप्ताहाच्या आयोजनाचा पहिला मान मुंबईला मिळाला. १३ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत हा सप्ताह राबविण्यात येणार असून, त्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर भव्यदिव्य मेक इन इंडिया सेंटर उभारण्यात आले आहे. मोदींच्या हस्ते सकाळी या सेंटरचे उद्घाटन झाले.या वेळी फिनलँडचे पंतप्रधान जुहा सिपीला, पोलँडचे पहिले उपपंतप्रधान प्रो. पिओत्र ग्लिन्स्की यांच्यासह राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर पंतप्रधानांनी मान्यवरांसह ‘मेक इन इंडिया सेंटर’मधील विविध दालनांना भेटी देऊन पाहणी केली.