शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

वाहन कर चुकवण्यात मुंबईकर आघाडीवर

By admin | Updated: March 6, 2017 06:23 IST

भारताची आर्थिक राजधानी ही मुंबई आहे. मात्र हीच आर्थिक राजधानी वाहन कर चुकवण्यात आघाडीवर आहे.

मुंबई : भारताची आर्थिक राजधानी ही मुंबई आहे. मात्र हीच आर्थिक राजधानी वाहन कर चुकवण्यात आघाडीवर आहे. परराज्यात महागड्या व आलिशान गाड्यांची नोंदणी करून कर चुकवणाऱ्या आणि नंतर महाराष्ट्रात वाहन चालवणाऱ्या कार मालकांवर आरटीओकडून कारवाईची करण्यात आली आहे. यात आतापर्यंत ५९२ महागड्या वाहनांवर कारवाई करण्यात आली असून यातील ४३१ वाहने ही मुंबईतील असल्याचे समोर आले आहे. मुंबईनंतर पुणे आणि त्याचबरोबर ठाण्यातीलही कर चुकवणाऱ्यांचा नंबर लागतो. महाराष्ट्र सोडता काही राज्यांत वाहन कर हा जवळपास ५ टक्के आहे, तर महाराष्ट्रात हाच कर जवळपास २० टक्के एवढा आहे. त्यामुळे कमी कर असणाऱ्या राज्यात वाहन नोंदणी केल्यानंतर, कर चुकवून ही वाहने महाराष्ट्रात चालवली जातात. अशा वाहनांवर राज्याच्या परिवहन विभागाकडून कारवाई केली जाते. १८ जानेवारीपासून परिवहन विभागाकडून महाराष्ट्राबाहेर नोंदणी करणाऱ्या आणि कर चुकवणाऱ्या वाहनांविरोधात कारवाईस सुरुवात करण्यात आली. या कारवाईत सिक्किम, पाँडेचेरी,झारखंड यासह अन्य ठिकाणी नोंद झालेल्या वाहनांना पकडण्यात आले. यामध्ये मर्सिडीज, आॅडी, फेरारी, बीएमडब्ल्यू या महागड्या गाड्या पकडण्यात आल्या आहेत. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत ५९२ वाहने पकडण्यात आली असून यामध्ये मुंबईतील ४३१ वाहने आहेत. त्यानंतर पुण्यातील ६३, ठाण्यातील २२, पनवेलमधील २१, नवी मुंबईत २२, नाशिक विभागातील ११, औरंगाबादमध्ये चार यासह अन्य शहरातही वाहने पकडण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली. पकडण्यात आलेल्या प्रत्येक वाहनांची किंमत ही २५ लाखांपासून ते चार कोटींपर्यंत आहे. (प्रतिनिधी)कर चुकवणाऱ्या महागड्या वाहनांवर आरटीओची कारवाईआरटीओकडून साडेपाच कोटी रुपये कर वसूलमुंबईनंतर पुण्याचा, ठाण्याचा नंबरआरटीओकडून कर वसुलीवाहन कर चुकवल्याने वाहन मालकांकडून कर वसुलीही करण्यात आली आहे. आतापर्यंत साडेपाच कोटी रुपये कर वसूल करण्यात आला आहे.>या कारवाई दरम्यान बॉलिवूडमधील दोन सेलिब्रेटींच्या महागड्या गाड्यांवरही वाहन कर चुकवल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. >मुंबईत कर चुकवणारी सर्वाधिक वाहने पकडण्यात आली आहेत. अन्य शहरातही कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत ५९२ महागड्या गाड्या पकडण्यात आल्या. ही कारवाई यापुढेही सुरूच राहील. त्यामुळे वाहन कर भरा हेच आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात येत आहे. - प्रदीप शिंदे, उपपरिवहन आयुक्त (अंमलबजावणी)