शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांच्या नशिबी ठेंगा..

By admin | Updated: July 11, 2014 00:55 IST

आज जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात मात्र देशाचे आर्थिक केंद्र असलेल्या महानगरी मुंबईला ठेंगाच दाखवण्यात आला आहे.

मुंबई : मुंबईतून केंद्राला तब्बल 68 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळत असताना आज जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात मात्र देशाचे आर्थिक केंद्र असलेल्या महानगरी मुंबईला ठेंगाच दाखवण्यात आला आहे. या मोघम अर्थसंकल्पातून मुंबईच्या पदरी नेमके काय पडले, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
मिनी इंडिया अशी ओळख असलेली मुंबई नानाविध उद्योगक्षेत्रंची जननी आहे. बँकिंगपासून थेट बॉलीवूडर्पयतच्या अनेक क्षेत्रंचा मुंबईत पसारा आहे. दीड कोटी लोकसंख्येची मुंबई देशाच्या वेगवेगळ्या भागातील अर्थस्रोत आहे. वेगवेगळ्या करांच्या रूपाने केंद्राच्या खजिन्यात मुंबई 68 हजार कोटी रुपये जमा करीत असताना आर्थिक केंद्र म्हणून मुंबई अधिक बलशाली करण्याचा विचार या अर्थसंकल्पातून झाल्याचे दिसत नाही, अशी प्रतिक्रिया उद्योजकांपासून सर्वसामान्य मुंबईकरांर्पयत सारे जण व्यक्त करीत आहेत.  
दिल्लीला जागतिक दर्जाचे शहर बनवण्याच्या उद्देशाने वीजपुरवठय़ासाठी 2क्क् कोटी आणि पाणीपुरवठय़ासाठी 5क्क् कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली असताना मुंबईकडेही असे लक्ष का देण्यात आले नाही, अशी भावना सर्वसामान्य मुंबईकरांमध्ये आहे. वास्तविक उद्योगनगरी मुंबईत पायाभूत सुविधांपासून, दळणवळणाची साधने, आरोग्य, वीज, पाणी अशा मूलभूत सुविधांसाठी निश्चित तरतूद होणो अपेक्षित असताना त्याबाबत मुंबापुरीच्या पदरी काहीच पडलेले नाही. देशात रस्त्यांचे जाळे उभारण्यासाठी 37 हजार 8क्क् कोटी रुपयांची तरतूद केली असताना त्यातील किती मुंबईच्या रस्त्यांवर खर्च होतील, हे अनाकलनीय आहे. मिठी नदीला एकही दमडी मिळाली नसल्याने अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी काय होणार, हा प्रश्नही मुंबईकरांना धडकी भरवणारा आहे. 
मुंबईतील महिलांची सुरक्षा हा सध्याचा ऐरणीवरचा प्रश्न आहे. महिलांसाठी दिल्लीत आपत्कालीन व्यवस्थापन केंद्र आणि निर्भया निधीसाठी सरकार तरतूद करणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी मोठय़ा शहरांमध्ये 15क् कोटी रुपये खर्च होणार आहेत. मात्र या दृष्टीने मुंबईचा विचार अर्थसंकल्पात झाल्याचे दिसत नाही. एकूणच मुंबईबाबत मोघम असलेला हा अर्थसंकल्प मुंबईकरांच्या पचनी पडलेला नसल्याचेच दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
 
अर्थसंकल्प सामान्य, सेलीब्रिटींच्या नजरेतून
‘सबका साथ सबका विकास’ या उद्दिष्टाने सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाचे आज सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले. गृहिणी, नोकरदार वर्ग, व्यावसायिक तसेच सेलीब्रिटींकडूनही हा अर्थसंकल्प स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
 
रोजच्या दैनंदिन वापरात येणा:या तेल आणि साबण यांसारख्या वस्तूंचे भाव स्वस्त करण्यात आल्याने सामान्यांत आनंदाचे वातावरण आहे. तसेच करमुक्त मर्यादा वाढवल्याने नोकरदार वर्गात उत्साह दिसून येत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी ज्यादा फंड देणार असल्याने आनंद असला तरी प्रत्यक्षात महिलांची सुरक्षा करण्यात आली पाहिजे, असाही सूर महिलांमधून उमटत आहे.
 
पेट्रोल, डिङोल ही इंधने तसेच रस्त्यांवर आकारण्यात येणारे टोल पूर्णपणो माफ करण्यात यावा, अशी अपेक्षा तरुण मंडळीतून करण्यात येत आहे. तसेच तरुणाईचा विचार करून नोकरीच्या संधी वाढवण्यात येणार असल्याने तरुणाई खुशीत आहे. सिनेमंडळीतूनही अर्थसंकल्पाचे स्वागत होत आहे. मूळ देशाच्या किसानाला, त्याच्या मालाला योग्य किंमत मिळवून देण्यासाठी सरकारने केलेली ही योजना सर्वानाच आवडली आहे. 
 
विकासाकडे वाटचाल करणारी पावले 
सरकार बदलले आहे, त्यामुळे लगेचच कोणताही बदल घडणार नाही. त्यामुळे आज जो अर्थसंकल्प सादर झाला आहे त्याचा फार आनंद वाटत आहे. निदान देशाच्या विकासाकडे वाटचाल करणारी पावले या नवीन सरकारने उचलली आहेत. सामान्य नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना उत्तम आयुष्य जगता येण्यासाठी मदतच होणार आहे. तसेच ब्रॅँडेड वस्तूंचे भाव वाढवल्यामुळे सामान्य नागरिकांना विशेष फरक पडणार नसल्याने या अर्थसंकल्पाचे स्वागतच आहे. आता पेट्रोल, डिङोल या इंधनाचेही भाव कमी झाल्यास सर्वसामान्यांना दिलासाच मिळेल.
- पुष्कर जोग, अभिनेता
 
भविष्याच्या दृष्टिकोनातून फायद्याचा
या अर्थसंकल्पात सर्वाचाच विचार बारकाईने करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे सिगारेट्स, मद्य महागल्याने थोडय़ाफार प्रमाणात तरी व्यसनमुक्ती होण्यास सुरुवात होईल. महिलांचाही केलेला विचार प्रशंसनीय आहे. तसेच करमुक्त उत्पन्नाच्या नवीन घोषणोमुळे मध्यमवर्गीयांना सेव्हिंग्स करता येतील. भविष्याच्या दृष्टिकोनातून हा उत्तम आणि सकारात्मक अर्थसकल्प आहे, असे म्हणता येईल.
- आदिती सारंगधर, अभिनेत्री
 
निश्चित धोरण आहे हे जाणवले
या बजेटमधून पुढच्या 15 वर्षाचा विचार करून निर्णय धेतले आहेत. तसेही हे बदल एक-दोन वर्षात होण्यासारखे नाहीत बजेटमध्ये लाँगटर्म प्लॅनिंग केलेले दिसतेय. पुढच्या 5 ते 1क् वर्षाचा विचार त्यामध्ये आहे. तसेच विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन प्रत्येक शहराला सोयी देण्याचा विचार केलेला दिसतो.  काही व्यवसायभिमुख घेतलेले निर्णय पुढच्या पिढीसाठी फायद्याचे ठरणार आहेत. एकंदर बजेटमधून मध्यमवर्गीयांच्या फायद्याचा विचार सुखावह आहे.
- हृषीकेश जोशी, लेखक/ अभिनेता
 
देशी वस्तूंचा वापर अधिक करण्याचा सरकारचा उद्देश
देशी वस्तूंना स्वस्त करून देशातील जनतेने अधिकाधिक प्रमाणात त्यांचा वापर करावा, या सरकारच्या उद्देशाचे कौतुकच आहे. यामुळे शेतक:यांना त्याचा जास्त फायदा होणार असल्याने आनंद आहे.  या अर्थसंकल्पाचे स्वागतच आहे.
- वैभव मांगले, अभिनेता
 
विकासाच्या दिशेकडे नेणारा 
आज जाहीर झालेला अर्थसंकल्प हा विकासाच्या दिशेकडे नेणारा अर्थसंकल्प आहे. देशी बनावटीच्या वस्तू वापरणो, सौरऊर्जेची उपकरणो वापरणो यांसारख्या काही गोष्टींमुळे देशातील सर्व घटकांतील जनतेला विकासाकडे नेण्याचा दृष्टिकोन सरकारचा आहे. 
                     - स्मिता तांबे, अभिनेत्री
 
तळागाळातील लोकांचा विचार
केंद्र शासनाच्या आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामुळे फारच आनंद झाला आहे. तेल, साबण आणि देशी बनावटीची स्टीलची भांडी स्वस्त करून एकप्रकारे देशातील कामगार आणि तळागाळातील ग्रामीण लोकांना उभारी देण्याचा प्रयत्न आहे. याचा फारच आनंद आहे.
- ऊर्मिला कानिटकर, अभिनेत्री
 
सामान्यांना दिलासा 
सामान्य नागरिकांचा विचार करून हा अर्थसंकल्प तयार केला आहे. रोजच्या वापरात असलेल्या आणि गरजेच्या वस्तूंचे भाव कमी केल्याने सामान्य नागरिक म्हणून दिलासा वाटतो. चैनीच्या वस्तूंचे भाव वाढवल्याने जनतेच्या दैनंदिन आयुष्यावर फार परिणाम होणार नाही.
          - सलील कुलकर्णी, संगीतकार
 
अर्थसंकल्प 2क्14-15 हा आरोग्य क्षेत्रसाठी निराशाजनकच वाटतो आहे. आरोग्य क्षेत्रतील काही भागांविषयी अर्थमंत्र्यांनी काहीही ठोस सांगितलेले नाही. या अर्थसंकल्पातील सकारात्मक गोष्टी म्हणजे 4 ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. याचबरोबरीने देशभरामध्ये 12 सरकारी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे जास्त प्रमाणात तज्ज्ञ डॉक्टर, डेंटिस्ट देशाला मिळणार आहेत. टीबीसाठी काम करणा:या दोन संस्था सुरू करण्यात येणार आहेत. अजून एक चांगली घोषणा म्हणजे मोफत निदान आणि उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या अर्थसंकल्पात आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणा:या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य आणि राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानासंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. भविष्याच्या दृष्टिकोनातून कोणत्याही आरोग्य मोहिमेची घोषणा करण्यात आलेली नाही.
- डॉ. राजीव बोधनकर, उपाध्यक्ष, कोहिनूर रुग्णालय
 
राष्ट्रीय ग्रामीण पिण्याच्या पाण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये  3 हजार 6क्क् कोटींची तरतूद केलेली आहे, ही चांगली गोष्ट आहे. यामुळे शाळेतील मुलांची स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची सोय होईल. देशात 4 एम्स सुरू करणार आहेत. अधिक विद्याथ्र्याना वैद्यकीय शिक्षण घेता यावे, म्हणून 12 सरकारी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करणार आहेत. वैद्यकीय शिक्षणाच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे. 
- डॉ. रमाकांत पांडा, एशियन हार्ट इन्स्टिटय़ूट
 
आजाराचे मोफत निदान आणि उपचार करणार असल्याचे या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केले आहे. ग्रामीण विभागातील आरोग्य सुधारण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर 15 आरोग्य केंद्रे सुरू करणार आहेत. आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने सरकारने योग्य ती पावले उचलली आहेत. सारासार अर्थसंकल्पाचा विचार केल्यास प्रगतीच्या दृष्टीने पुढे पाऊल टाकणारा असा हा अर्थसंकल्प आहे. 
- डॉ. रमण गोयल, हिंदुजा हेल्थकेअर
 
तंबाखू, सिगारेट यांच्यावरील कर वाढवला आहे. ही या अर्थसंकल्पातील चांगली गोष्ट आहे. कर वाढल्यामुळे तंबाखू खरेदीमध्ये 5 टक्क्यांनी तरी नक्कीच घट होईल, असा विश्वास वाटतो. तंबाखूमुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात येते. तंबाखूमुळे होणा:या आजारांवर अनेक कोटी रुपये सरकारला खर्च करावे लागतात. कर वाढल्यामुळे हे सर्वच टाळता येणार आहे. 
           - डॉ. पंकज चतुर्वेदी, टाटा रुग्णालय
 
मोदी सरकारने सादर केलेल्या पहिल्या अर्थसंकल्पात आणि आधीच्या सरकारच्या अर्थसंकल्पात जास्त काहीच फरक दिसून आलेला नाही. यामुळे या अर्थसंकल्पातून पदरी निराशाच पडली आहे. 2क्2क् चे ध्येय ठेवून आपण आरोग्य क्षेत्रविषयी चर्चा करत असू तर एकूण अर्थसंकल्पाच्या 1.7 टक्केच देणो योग्य नाही. एकूण अर्थसंकल्पापैकी कमीत कमी 3 ते 4 टक्के आरोग्यासाठी दिले पाहिजेत. 
          - डॉ. पवन कुमार, लीलावती रुग्णालय
 
महागाई कमी होण्याचा आशावाद
सरकारने सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्यात गरजेच्या उपयोगी असणा:या वस्तूंचे भाव कमी केले आहेत. देशभरात 24 तास वीजपुरवठा करणार असल्याच्या सरकारच्या ध्येयाचे कौतुक आहे.
- पराग निजामपूरकर
 
महिला सुरक्षेप्रश्नी निराशा
काही वर्षात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढतेच आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासादरम्यान महिलांवर होणा:या अत्याचारांच्या घटनांबाबत रेल्वे अर्थसंकल्पात तरतूद अपेक्षित होती, तेथे निराशा झाली.  
- दीपाली बल्लाळ
 
महिलांकडून स्वागत
महिलांवर रस्त्यात होणारे अत्याचार रोखण्यासाठी 1क्क् कोटींची तरतूद सरकारने केली असल्याचे आज अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले आहे. महिलांसाठी केलेल्या या विचाराचे स्वागतच आहे. 
                                                - जान्हवी जोशी
 
‘स्वदेशी’ चे स्वागत
‘सबका साथ, सबका विकास’ हे उद्दिष्ट ठेवून जाहीर झालेल्या अर्थसंकल्पाने सामान्यांना तूर्तास दिलासा दिला आहे. यात विशेष म्हणजे ‘स्वदेशी’चे स्वागत केल्यामुळे आनंद आहे. 
                                                  - उज्ज्वला सरेकर
 
तरुणाईला दिलासा! 
मोदी सरकारला निवडून देण्यात तरुण पिढीची महत्त्वाची भूमिका आहे. या अर्थसंकल्पाची सामान्यांप्रमाणो तरुण पिढीलाही प्रतीक्षा होतीच. त्यामुळे या अर्थसंकल्पामुळे तरुण पिढीलाही दिलासा मिळाला आहे. 
                                                       - समीप परब
 
अपेक्षाभंग केला
दुधाचे भाव वाढत आहेत. गॅसचे भाव वाढणार आहेत. कांदा, बटाटा स्वस्त होत नाही. पेट्रोलचे भाव वाढत आहेत. मग या अर्थसंकल्पाला दिलासा देणारा अर्थसंकल्प कसे म्हणायचे. 
                                                   - अन्नपूर्णा परब 
 
बजेटविषयी संमिश्र भावना
सेझ, झोपडपट्टीच्या पुनर्वसन योजनेमध्ये खासगी बिल्डरांना थेट परवानगी त्याचप्रमाणो बांधकाम क्षेत्रतील थेट परकीय गुंतवणुकीची अट शिथिल केल्याने या क्षेत्रतील मंदी दूर होण्यास मदत होणार आहे.
- आनंद गुप्ता (सचिव, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया)
 
लहान शहरे विकसित करण्यासाठीची योजना महत्त्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणो झोपडपट्टीमुक्त शहरासाठी खासगी विकासकांना संधी देण्याचे अर्थमंत्र्यांचे धोरण  स्वागतार्ह आहे. त्यामुळे मुंबईतील गृहयोजनांना चालना मिळेल.
- सुरभी अरोरा (असोसिएट संचालक, रिसर्च कोर्लीस इंटरनॅशनल)
 
1क्क् स्मार्ट शहरे बनविण्याचे केंद्राचे धोरण आणि सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करण्याचा संकल्प बांधकाम क्षेत्रसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे मंदीचे सावट दूर होऊन रोजगाराची निर्मिती होईल.
- संतोष निमा (मुख्य कार्यकारी अधिकारी, रॅक सिरॅमिक्स)
 
बजेट ग्राहकाबरोबरच विकासकांनाही उपयुक्त असले तरी गृहकर्जावरील व्याजाची मर्यादा वाढविण्याप्रमाणो दुस:या घरासाठीही योजना लागू करावयास हवी होती. एलआयजी व एमआयजी गटातील नागरिकांसाठी 75क् चौरस फुटांच्या घरांसाठी वेगळे पॅकेज देण्याची आवश्यकता होती.  
-उत्तम नातू (संचालक, नातू परांजपे बिल्डर्स)
 
हे बजेट गुंतवणूक आणि विकासाला गती देण्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. त्यासाठी बजेटमध्ये पुढाकार घेतलेला दिसून येतो. आज जाहीर केलेले निर्णय आणि योजना देशाला विकासाकडे नेण्यास महत्त्वाची भूमिका बजावतील असा मला विश्वास वाटतो. 
- चंदा कोचर, एमडी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयसीआयसीआय बँक 
 
हे बजेट म्हणजे एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. करासंबंधात उचललेल्या पावलांमुळे आर्थिक शिस्त, जबाबदारी आणि पारदर्शकता आणली जाईल. ते नक्कीच फायद्याचे ठरेल. 
- एम.आर. मुकुंदन, व्यवस्थापकीय संचालक, टाटा केमिकल्स
 
हे बजेट चांगल्या अर्थशास्त्रचे प्रतीक मानायला हवे. त्यामुळे भविष्यात अनेक चांगल्या संधी निर्माण होतील. तसेच हे चागल्या राजकारणाचे द्योतकही आहे. 
- मधूर बजाज, उपाध्यक्ष, बजाज ऑटो