शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
4
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
5
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
6
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
7
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
8
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
9
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
10
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
11
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
12
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
13
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
14
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
15
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
16
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
17
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
18
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
19
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
20
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू

मुंबईकर संभ्रमावस्थेत!

By admin | Updated: July 2, 2017 06:54 IST

देशात शुक्रवारी रात्री १२ वाजता कर प्रणालीत एक ऐतिहासिक बदल घडून आला. गेल्या आठवड्याभरापासून ‘जीएसटी’ हा शब्द

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशात शुक्रवारी रात्री १२ वाजता कर प्रणालीत एक ऐतिहासिक बदल घडून आला. गेल्या आठवड्याभरापासून ‘जीएसटी’ हा शब्द सर्वत्र ऐकू येत होता. टीव्ही चॅनेलपासून कॉलेजचा कट्टा ते गल्लीबोळावरही याचीच चर्चा रंगली होती. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईत जीएसटीचा काय बदल दिसणार याकडे अनेकांचे लक्ष लागून होते. प्रत्यक्षात रात्री १२ वाजता जीएसटी लागू झाला. पण पहिल्याच दिवशी मुंबईत गडबड गोंधळच दिसून आला. व्यापारी, दुकानदार, तरुण आणि गृहिणीही जीएसटीबाबत संभ्रमावस्थेत असल्याचे चित्र दिसून आले. याच ‘जीएसटी’विषयी जाणून घेतल्या मुंबईकरांच्या या प्रतिक्रिया.सरकारला उशिरा शहाणपण सुचलेआधीच्या सरकारने जीएसटी आणण्याचा घाट घातला होता, तेव्हा आताच्या सरकारमधील नेत्यांनीच त्याला विरोध केला होता. त्या वेळी मोदी सरकारमधील आताच्या नेत्यांच्या मते, ‘जीएसटी’ करप्रणाली देशाला खड्ड्यात घालणार असे होते. परंतु उशिरा का होईना, सरकारला शहाणपण सुचले. काँगे्रस सरकारच्या काळात जीएसटीला विरोध केला नसता तर आतापर्यंत भारताचा आर्थिक विकासदर खूप वाढला असता. जीएसटी लागू झाल्यामुळे देशाचा आर्थिक विकासदर तीन ते चार टक्के वाढेल, अशी अपेक्षा आहे. शासनाने घरांच्या किमती कमी होतील, असा दावा केला असला तरी तो किती खरा आहे, हे कालांतराने स्पष्ट होईल.- वर्षा विद्या विलास, सरचिटणीस, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यदेश महासत्ता बनेलसामान्य नागरिकांना जीएसटीचा चांगला फायदा होणार आहे. मोठ्या व्यापाऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. मोठ्या व्यापाऱ्यांना अनेक माध्यमातून कर भरावा लागत होता. पण आता जीएसटीमुळे त्यांचे काम सोपे झाले. आमच्यासारख्या व्यापाऱ्यांपासून ते फेरीवाल्यापर्यंत प्रामाणिकपणे कायद्याला साथ दिली, तर भ्रष्टाचार कमी होतील. देशाची प्रगती लवकर होईल आणि आपला देश महासत्ता बनेल. - विनोद शहा, दी न्यू दादर स्टोअर्स, दादरऔषधोपचार होणार स्वस्त जीएसटी लागू केल्यानंतर आरोग्य क्षेत्राला त्याचा अधिक फायदा होणार आहे. कारण, जीएसटीमुळे औषधोपचार स्वस्त होणार असल्याने गरीब रुग्णांना दिलासा मिळणार आहे. या करामुळे रुग्णालयातील उपचार आणि औषधांचा खर्च नक्कीच कमी होणार आहे. तसेच स्टेण्टच्या किमती एकसमान झाल्या आहेत. त्याचबरोबरीने आता हृदयविकाराची पॅकेजसही कमी होतील. फक्त आरोग्य विम्याचा हफ्ता जीएसटीमुळे वाढणार आहे. आधी आरोग्य विम्यावर १५ टक्के कर होता, आता १८ टक्के भरावे लागणार आहेत. - डॉ. विजय सुरासे, हृदयरोग तज्ज्ञ सॅनिटरी नॅपकिन करमुक्त करावे‘एक देश एक कर’ ही संकल्पना देशाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावेल. आता देशात एखाद्या वस्तूची किंमत एकच राहणार आहे. महिलांसाठी आवश्यक असलेल्या सॅनिटरी नॅपकिनना जीएसटी लागू होणार आहे. हे महागल्यामुळे महिलांना याचा फटका बसणार आहे. सरकारने याचा पुनर्विचार करून त्याला जीएसटीमधून वगळले पाहिजे. जीएसटीमुळे महागाई कमी होईल. जीएसटीमुळे जकातीसाठी लागणाऱ्या वाहनांच्या रांगा बंद होणार आहेत. त्यामुळे इंधनाची बचत होऊन, प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. - सुभाष मराठे, संस्थापक-अध्यक्ष, सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटनाइंधनाचा दर कमी होईल ‘जीएसटी’मुळे सर्व राज्यांत वस्तूंच्या किमती सारख्याच राहतील. सरकारला आता सर्वांकडून एकसारखाच कर मिळेल. त्यामुळे आर्थिक स्तर उंचावेल. जकात कर रद्द झाल्यामुळे वाहतूककोंडी कमी होईल. त्यामुळे इंधनाचा खर्च कमी झाल्यामुळे कंपन्या वस्तूंचा दर कमी लावतील. हॉटेलमधील सेवांवरील कर सर्वांना सारखे पाहिजे होते.- सुनीता गायकवाड, गृहिणी, घाटकोपर बिल करताना अडचणी जीएसटी लागू झाला. पण कर आकारणी कशी करायची याबाबत स्पष्टता नाही. तसेच बिल कसे बनवायचे याविषयी पूर्ण माहिती नसल्याने औषध विक्रेते संभ्रमात होते. आज औषध विक्री केल्यावर बिल तयार करण्यात आले. पण हे बिल १०० टक्के बरोबर आहे का, याविषयी कोणालाच नक्की माहिती नाही. कारण, सरकारने जीएसटी लागू करताना औषध विक्रेत्यांना कोणतीही स्पष्टता दिलेली नाही. - प्रसाद दानवे, रिटेल अ‍ॅण्ड डिसपेन्सिंग केमिस्ट असोसिएशन आम्ही धंदा कसा करायचा?जीएसटीनुसार गिरणीत कपड्यावर ५ टक्के कर लावून तो घाऊक विक्रेत्याला विकला गेला. पुन्हा घाऊक विक्रेता किरकोळ (रिटेलर) व्यापाऱ्यांना ५ टक्के कर लावून तोच कपडा देणार. मात्र आम्ही जेव्हा मार्केटमध्ये हा कपडा विकणार तर ग्राहक आमच्याकडून भाव कमी करूनच मागणार. म्हणजे आम्ही ५ टक्के कर भरून एखादी वस्तू १०५ रुपयांना विकत घेणार. मात्र ग्राहक तीच वस्तू ८०/९० रुपयांना मागणार. जर ती वस्तू त्या किंमतीला विकली तर माझे नुकसानच आहे.- हिम्मतराम चौधरी, अध्यक्ष, श्री शिवशक्ती सोसायटी व्यापारी संघटन, साईनाथ मार्केट परराज्यात शाखा वाढविणे सोपेजीएसटीमुळे विक्रीवर मोठा परिणाम होणार आहे. विक्रीचे प्रमाण कमी होईल. पुढचे किमान तीन महिने या परिस्थितीचा सामना करावा लागेल. त्यानंतर परिस्थिती स्थिर होईल. इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू महागणार आहेत. आधीच महागड्या वस्तू अधिक महाग होतील. विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीमध्ये बदल होतील. या प्रक्रियेला काही दिवस लागतील. परंतु, वाढलेल्या किमतींमुळे ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागणार आहे. पण जीएसटीमुळे आम्हाला विविध राज्यांत व्यापार करणे आणि शाखा वाढवणे सोपे होईल. - आलोक शाह, शाखा व्यवस्थापक, कोहिनूर टेलिव्हिडीओ, दादरसरकारने मूलभूत वस्तू आणि लक्झरी वस्तू असे विभाजन करून वस्तू व सेवा कर आकारला आहे. जीएसटी हा आधीच्या करापेक्षा खूप चांगला असून कळायला सोपा आहे. सगळ्या वस्तूंचा भाव वाढेल, अशी लोकांच्या मनात भीती होती,पण असे काही झाले नाही. - समता महाजन, गृहिणी, गोरेगावजीएसटीविषयी अधिक स्पष्टता नाही, त्यामुळे संभ्रमात आहे. परंतु वेगवेगळे कर भरण्यापेक्षा एक कर प्रणाली नक्कीच उपयुक्त ठरेल. जीवनावश्यक वस्तूंवरील कर बंद केल्याचा सर्वसामान्यांना फायदा होईल. - आशा शेंडे, गृहिणी, अंबरनाथजीएसटी म्हणजे काय हे मला माहीत नाही. त्यामुळे त्याबद्दल मी काय सांगू शकत नाही. मुळात जीएसटी काय आहे हे माध्यमातील लोकांनी सांगितले पाहिजे. याबद्दल माझ्या सी.ए.लासुद्धा काही माहिती नाही.- प्रिन्स टेलर, व्यापारी, घाटकोपरसरकारचा जीएसटी लागू करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. याबद्दल सरकारचे कौतुक करायला हवे. जीएसटीमुळे काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल. देशातील ही सर्वात मोठी अर्थक्रांती म्हणावी लागेल.- कृतिका धनावडे, गृहिणी, घाटकोपरजीएसटीने जर देशात सकारात्मक बदल घडत असतील, तर फार चांगले आहे. त्याचबरोबर कमी करामुळे जर वस्तूची किंमत कमी होण्यास मदत होईल. जीएसटीचे पडसाद भविष्यात दिसून येतीलच, पण सध्या तरी जीएसटीचे स्वागत.- वैशाली शेवाळे, गृहिणी, वरळीमाझ्यानुसार, जीएसटी हा फक्त देखावा आहे. जीएसटीमुळे कर कमी होईल, पण किमती वाढतील. विद्युत उपकरणांवर २८ टक्के कर आहे. पण याने किमतीवर परिणाम होणार नाही. तर सेवा कर हा कमी होणार आहे. जीएसटीमुळे आमच्या व्यापारी वर्गाचे कागदी काम वाढणार आहे. ६ तारखेपासून नवीन साठा भरणार आहे. घाऊक विक्रेत्याकडून ज्या किमतीला उपकरणे मिळतील त्यानुसार किरक ोळ विक्रेते किंमत ठरवतील. - चंपालाल खुराना, सोना टीव्ही सेंटर, लोअर परेल