शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सायकल रेसमध्ये मुंबईकर अव्वल

By admin | Updated: June 13, 2016 04:11 IST

सायकलिंग स्पर्धेत मुंबईच्या ओमकार जाधवने गतविजेत्या अक्षय मोयेला मागे टाकत प्रथमच प्रो स्टार बाइक्स मुंबई अजिंक्यपद सायकलिंग स्पर्धा जिंकली

ठाणे : पावसाच्या सरींसोबत झालेल्या सायकलिंग स्पर्धेत मुंबईच्या ओमकार जाधवने गतविजेत्या अक्षय मोयेला मागे टाकत प्रथमच प्रो स्टार बाइक्स मुंबई अजिंक्यपद सायकलिंग स्पर्धा जिंकली. तसेच महिला गटात मुंबईच्याच मधुरा वायकरने बाजी मारली. ठाणे जिल्हा सायकलिंग संघटना, मुंबई शहर सायकलिंग संघटना आणि मुंबई उपनगर सायकलिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या स्पर्धेला लोकपुरम स्कू ल येथून सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ओमकारसमोर गतविजेत्या अक्षय मोयेसह यंदाच्या हंगामात चमकदार कामगिरी करणाऱ्या धीरेन बोत्राचे तगडे आव्हान होते. धीरेनने ओमकारला मागे टाकत ही शर्यत प्रथम पूर्ण केली; पण आधी ताकीद दिलेली असतानाही, त्याने हात सोडून आणि पाय उंचावत धोकादायक पद्धतीने अंतिम रेषा पार केली. यामुळेच धीरेनला पंचांनी बाद ठरवल्याने त्याला या स्पर्धेच्या विजेतेपदावर पाणी सोडावे लागले. संभाव्य विजेता म्हणून त्याच्याकडे पाहिले जात असल्याने धिरेनला नियमाचे उल्लंघन न करण्याची ताकीद दिली होती. त्यामुळे १ तास १५ मिनिटे ४४ सेकंदांत ५० किमीचे अंतर पार करणाऱ्या ओमकारला विजेता म्हणून घोषित करण्यात आले. ओमकारपाठोपाठ मेहेर्झाद इराणी दुसऱ्या स्थानावर राहिला. गतविजेत्या अक्षय मोयेला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या गटामध्ये मुंबईच्या अनुभवी मधुरा वायकरने अव्वल स्थान पटकावले. मधुराने इतर सायकलपटूंना एक ते दोन किलोमीटर अंतराने मागे टाकत ही स्पर्धा सहज जिंकली. तिला ३४ किमी अंतर पार करण्यासाठी ३५ मि. ३० सेकंद इतका वेळ घेतला. तर, पूजा कश्यप दुसऱ्या आणि प्रियंका टक्कर तिसऱ्या स्थानावर राहिली. १० वर्षांखालील मुलांच्या गटात शौर्य मकवाना याने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच १६ वर्षांखालील गटात विजयी सिद्धार्थ दवंडे याला फोरम्याट सायकल पारितोषिक म्हणून देण्यात आली. (प्रतिनिधी) >स्पर्धेचा गटनिहाय निकालमुले १० वर्षांखालील (३ किमी) : शौर्य मकवाना (६.३३ मिनिटे), हर्ष गुप्ता, विहान वेंगुर्लेकर. मुले १६ वर्षांखालील (६ किमी) : सिद्धार्थ दवंडे (१०: १७ मिनिटे), आयुष पंडूर, सिद्धेश शर्मा. एम टी बी नोविसेस पुरु ष (१७ किमी) : अमर पटेल (३०: १७ मिनिटे), जितेन मोहनन, ओमकार जंगम.हायब्रीड नोविसेस पुरु ष (३४ किमी) : रोनित व्होरा (५७. ४९ मिनिटे) सुशील तिवारी, नीरजकुमार. रोड नोविसेस (३४ किमी) : शाकिब शेख (५१: १४ मिनिटे), मिर्झा बेग, मनीष नंबियार. अशोक खळे यांचा गौरवआंतरराष्ट्रीय सायकलपटू आणि शिवछत्रपती पुरस्कारविजेते ज्येष्ठ सायकलपटू अशोक खळे यांचा यावेळी रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि तुळशीचे रोपटे प्रदान करुन संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला.