शहरं
Join us  
Trending Stories
1
संयम आणि आक्रमकतेचा मिलाफ! भारतीय क्रिकेटचा नवा 'कॅप्टन कूल' म्हणून श्रेयस अय्यरचा उदय
2
आजचे राशीभविष्य : ०५ जून २०२५; आज क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल, शुभ कार्याची प्रेरणा मिळेल
3
अकरावीसाठी १२.२ लाख अर्ज; आज शेवटचा दिवस; ९०० तक्रारी प्रलंबित असल्याची माहिती
4
विशेष नव्हे, आता थेट पावसाळी अधिवेशन; ऑपरेशन सिंदूरमुळे विरोधकांकडून होती मागणी
5
जय श्रीराम! इलॉन मस्क यांचे वडील इरॉल मस्क यांनी अयोध्येत घेतले रामललाचे दर्शन
6
१००ची वस्तू १९ हजारांना; बंदी असूनही UAEमार्गे पाकशी जोडलेला व्यापार भरभराटीला
7
जातनिहाय जनगणना देशासाठी का महत्त्वाची? नेमका कुणाला, किती फायदा? जाणून घेऊया
8
दहिसर ते अंधेरी मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिका ठरल्या कार्बन न्युट्रल कॉरिडॉर
9
एनएमएमटीच्या चार बस जळून खाक; घणसोली आगारात आणखी तीन ते चार बसचे नुकसान
10
बंगळुरुच्या जल्लोषात चेंगराचेंगरी, अतिउत्साह बेतला जिवावर; ११ ठार, ३३ जण जखमी
11
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
12
नवी मुंबईची बस अंधेरीत जळाली; प्रवाशांची सुखरूप सुटका; शॉर्टसर्किटचा संशय
13
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
14
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
15
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
16
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
17
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
18
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
19
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
20
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  

संशयिताने घेतली मुंबईच्या तरुणांची भेट

By admin | Updated: January 25, 2016 02:46 IST

शनिवारी उत्तर प्रदेशात अटक केलेला रिझवान अहमद ऊर्फ नवाजुद्दीन ऊर्फ रिझवान याने हाजी अलीजवळ ४ मालवणी तरुणांची भेट घेतली होती,

डिप्पी वांकाणी,  मुंबईशनिवारी उत्तर प्रदेशात अटक केलेला रिझवान अहमद ऊर्फ नवाजुद्दीन ऊर्फ रिझवान याने हाजी अलीजवळ ४ मालवणी तरुणांची भेट घेतली होती, अशी माहिती समोर आली आहे. यासंबंधीचे पुरावे महाराष्ट्र एटीएसकडे असल्याची माहिती आहे.एटीएसशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, रविवारी एटीएसने रहमान नावाच्या आणखी एका तरुणाचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला. रहमानही याच मोड्युलचा भाग असल्याची माहिती आहे. तो भांडुपमध्ये अखेरचा आढळून आला होता. मालवणीमधून चार तरुण बेपत्ता आहेत. त्यातील एक जण आॅक्टोबरपासून, तर दुसरा डिसेंबरपासून गायब आहे. अयाज सुलतान नावाचा एक तरुण काबूलला गेला असून तो तालिबानमध्ये भरतीही झाला आहे. नूर मोहंमद आणि वाजेद शेख हे दोन तरुण परत आले आहेत. मोहसीन चौधरी नावाचा तरुण फरार असून त्याने अफगाणिस्तानची सीमा ओलांडल्याची शक्यता आहे.एका अधिकाऱ्याने सांगितले की, रिझवानने चार तरुणांना दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी कट्टरपंथी बनविल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. तो मुंबईत येऊन किमान एका तरुणाला हाजी अलीजवळ भेटल्याची खात्रीशीर माहिती आहे. आमचे पथक रिझवानला अटक करण्यासाठी उत्तर प्रदेशातील कुशीनगरमधील शिसवा मताया गावात गेले होते, तेव्हा त्याच्या कुटुंबाला अजिबात धक्का बसला नाही. तो काही तरी बेकायदेशीर काम करीत असल्याचा अंदाज आम्हाला होता, असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले.अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवारी माझगावमधून अटक केलेल्या खान मोहंमद हुसैन याच्याकडे बनावट कागदपत्रांच्या साह्याने १५० मोबाईल सीमकार्ड मिळविण्याची जबाबदारी देण्यात आली होती. हे कार्ड भरती करण्यात आलेल्या अतिरेक्यांना दिले जाणार होते.