शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमावर्ती राज्यांमध्ये उद्या होणारा मॉक ड्रिल पुढे ढकलला; 'ऑपरेशन शील्ड'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार
2
पुण्यात झाड कोसळून १ ठार; कोल्हापुरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना
3
एक वर्षानंतर 'कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, NB.1.8.1 व्हेरिएंट वाढले'; WHO ने दिला इशारा
4
शस्त्र परवान्यासाठी गोळीबाराचा बनाव; शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांना अटक
5
Vaishnavi Hagawane Death Case :'आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास'; हगवणेंच्या वकिलांच्या युक्तीवादावर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया
6
हगवणे बंधूंनी नीलेश चव्हाणच्या मदतीने केला आई, बहिणीचा मोबाईल लंपास; पोलिसांची कोर्टात माहिती
7
Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs ENG: खुद्द रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यासाठी 'या' व्यक्तीबद्दल गौतम गंभीरकडे केली विनंती
8
सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांची हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आरोपातून सुटका! लोकपालांनी दिली क्लीनचिट
9
आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या; आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु - हगवणेंचे वकील
10
पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
11
पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापून टाकले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट
12
टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा
13
वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
14
ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्याचे मार्ग, ऑपरेशन शील्ड' अंतर्गत उद्या या ४ राज्यांमध्ये मॉक ड्रिल होणार
15
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
16
माजी मंत्र्याचा सचिव, पाकिस्तानला पुरवत होता गुप्त माहिती! जैसलमेरमधून पकडला गेला आणखी एक गद्दार
17
इलॉन मस्क यांना नकार देणे 'अ‍ॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही
18
'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; सुषमा अंधारेंनी CM फडणवीसांना केली विनंती
19
बेडरूममध्ये बसली होती सवत, बघताच पहिल्या पत्नीला संताप झाला अनावर! पुढे पतीने जे केले, ते वाचून व्हाल हैराण
20
सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड...

तिसऱ्या प्रयत्नात मुंबई हादरवली!

By admin | Updated: February 9, 2016 04:22 IST

मुंबईतील ‘२६/११’वरील हल्ल्यापूर्वीही लष्कर-ए-तोयबाने (एलईटी) सप्टेंबर व आॅक्टोबर २००८मध्ये दोनदा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. एलईटचा म्होरक्या हाफीज सईद व झकीर-उर-रहमान

डेव्हिड हेडलीची कबुली : तेच दहशतवादी दोनवेळा परत गेले; पाकमध्ये कट रचल्याची माहिती; आयएसआयचा सक्रिय सहभागमुंबई : मुंबईतील ‘२६/११’वरील हल्ल्यापूर्वीही लष्कर-ए-तोयबाने (एलईटी) सप्टेंबर व आॅक्टोबर २००८मध्ये दोनदा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. एलईटचा म्होरक्या हाफीज सईद व झकीर-उर-रहमान लखवी यांच्या सूचनेनुसार पाकिस्तानात रचण्यात आलेला हा कट दोनदा अयशस्वी ठरला होता, अशी धक्कादायक माहिती या हल्ल्यातील माफीचा साक्षीदार बनलेला अमेरिकन नागरिक डेव्हिड हेडलीने सोमवारी दिली. त्याच्या साक्षीमुळे मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात आणि एकूणच भारतातील अतिरेकी कारवायांत पाकिस्तानचाच हात असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. अमेरिकेतील तुरुंगात असलेल्या हेडलीची मुंबईतील विशेष न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष नोंदविण्यात आली. लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना आहे. या संघटनेचा मूळ उद्देश भारताच्या लष्कराशी लढणे आणि काश्मिरींना मदत करणे, हा आहे. भारतामध्ये झालेल्या सर्व दहशतवादी कारवायांमागे एलईटीचा हात आहे, असेही हेडलीने स्पष्टपणे सांगितले. त्याच्या या साक्षीने पाकिस्तानच्या साऱ्या दहशतवादी कारवाया जगासमोर येण्यास मदत होणार आहे.आपण २६/११च्या हल्ल्यापूर्वी पाकिस्तानहून मुंबईत सात वेळा आलो होतो. या भेटीत काय करायचे आहे, याची पूर्ण कल्पना साजीद मीरने मला दिली होती. मुंबईत गेल्यावर महत्त्वाच्या ठिकाणांची व्हिडीओग्राफी कर, असे मीरने सांगितले होते. शिवाय २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतरही आपण ७ मार्च २००९ रोजी मुंबईत आलो होतो, असेही हेडलीने न्यायालयात सांगितले.असा फसलादोनदा डाव ‘२६/११’पूर्वी मुंबईत सप्टेंबर आणि आॅक्टोबर २००८मध्ये हल्ला करण्याचा कट होता. सप्टेंबरमध्ये कराचीबाहेरून शस्त्रास्त्रे, स्फोटके आणि १० अतिरेक्यांनी भरलेली बोट मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती. मात्र ही बोट मोठ्या खडकावर आदळल्याने एलईटीचा हा डाव फसला. शस्त्रास्त्रे आणि स्फोटके हरवली, तर १० अतिरेक्यांनी लाइफ जॅकेट घातल्याने ते पुन्हा पाकिस्तानमध्ये परतू शकले. आॅक्टोबरमध्ये हल्ला करण्याचा डाव का फसला? हे मला माहीत नाही. मात्र दोन्ही वेळा कटात सहभागी असलेलेच २६/११च्या हल्ल्यात सहभागी होते. त्या १० जणांनीच मुंबईवर हल्ला केला,’ असे हेडली म्हणाला.अबू जुंदालविरुद्धचा खटला मजबूत‘जगाच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच एका अतिरेक्याने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे परदेशातील न्यायालयात साक्ष दिली आहे. २६/११च्या हल्ल्यामागे असलेल्या योजनेवर हेडली प्रकाशझोत टाकेल. त्यामुळे अबू जुंदालविरुद्धचा खटला आणखी मजबूत होईल, असे अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी म्हटले.लखवीचा चेहरा जगासमोर हेडलीच्या या साक्षीमुळे पाकिस्तानचा अतिरेकी चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. या खटल्याचा मास्टर माइंड लखवी याच्यावर पाकिस्तानात या हल्ल्याप्रकरणी खटला सुरू आहे. त्याला शिक्षा देण्यासाठीही हेडलीची साक्ष महत्त्वाची ठरणार आहे.मंगळवारीही साक्ष२६/११च्या हल्ल्यासाठी मुंबईची रेकी करणाऱ्या हेडलीची साक्ष अतिशय महत्त्वाची आहे. या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अबू जुंदालवर सुरू असलेल्या खटल्यात साक्ष घेण्यात येत आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी ७ वाजता या खटल्याची सुनावणी सुरू झाली. अमेरिकन वेळेनुसार मध्यरात्री पाऊण वाजता हेडली न्यायालयासमोर साक्ष देत होता. त्याने प्रत्येक गुन्ह्याची कबुली दिली असून, मंगळवारीसुद्धा साक्ष घेतली जाणार आहे.हाफीजमुळे बनलो दहशतवादीएलईटीचा म्होरक्या हाफीज सईदच्या भाषणामुळे आपण एलईटीमध्ये सहभागी झालो. २००२पासून मुजफ्फराबाद (हेडलीच्या भाषेत ‘आझाद काश्मीर’) येथे कोर्सची सुरुवात झाली. येथे शस्त्रास्त्र प्रशिक्षण दिले जात असून, काश्मिरींना मदत करण्यास सांगितले जाते. भारतीय सैन्याने हल्ले केल्यास त्यांचा प्रतिकार करण्यास शिकवले जाते. थेट भारतीय सैन्याविरुद्ध लढण्याची माझी इच्छा होती. मात्र एलईटीतील मुख्य असलेल्या लखवीने माझे वय झाले असल्याने ते काम देण्यास नकार दिला. योग्य वेळी ते कामही दिले जाईल, असे सांगितले गेले, असे हेडलीने साक्षीत म्हटले.