ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 07 - मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक विस्कळीत झाली असून मुंबईकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरड कोसळण्याच्या भीतीने खबरदारीचा उपाय म्हणून ही वाहतूक बंद करण्यात आली असून एक्स्प्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ढासळणारे दगड हटवण्याचं काम सुरु असून तोपर्यंत ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.