खालापूर : प्रजासत्ताक दिन वीकेंडला जोडून आल्याने सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेल्या पर्यटकांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर तुरळक वाहने धावत असताना पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांची गर्दी झाली होती. खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बोरघाटात संथगतीने वाहतूक सुरू होती.खालापूर व कर्जत तालुक्यात अनेक फार्महाउस असून, महड येथील वरदविनायक, खोपोली येथील गगनगिरी महाराजांचा आश्रम, माथेरान तसेच अॅडलॅब या ठिकाणीही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाप्रमाणेच खालापूर व कर्जत तालुक्यातील रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात वाहने धावत आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती व जुन्या राष्ट्रीय महामार्गावरही वाहनांची गर्दी झाली. (वार्ताहर)
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे जाम
By admin | Updated: January 26, 2015 04:29 IST