शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पोलिसांचेही आता ट्विटर हँडल

By admin | Updated: December 29, 2015 02:09 IST

मुंबई पोलिसांनी आता अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करीत मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी आणखी एक कवच तयार केले आहे. मुंबई पोलिसांनी आता @Mumbaipolice या नावाने

मुंबई : मुंबई पोलिसांनी आता अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करीत मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी आणखी एक कवच तयार केले आहे. मुंबई पोलिसांनी आता @Mumbaipolice या नावाने टिष्ट्वटर हँडल सुरू केले आहे. त्यामुळे नागरिकांना आता आपल्या तक्रारी, समस्या, सूचना त्याद्वारे मांडता येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचा प्रारंभ करण्यात आला. ट्रिबल स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने हे अकाउंट सुरू करण्यात आले असून, या ठिकाणी सायबर सेलचे सात अधिकारी कार्यरत राहणार आहेत. या ठिकाणी आलेल्या तक्रारी थेट नियंत्रण कक्षात पाठविल्या जातील, तेथून त्या संबंधित विभाग व हद्दीतील पोलीस ठाण्याला कळविल्या जातील, त्यानंतर त्याबाबत कार्यवाही केली जाईल. या ट्विटरला रात्री ८ वाजेपर्यंत ५६७२ जणांनी ‘फॉलो’ केले. तर २३ जणांनी टिष्ट्वट आणि १७ जणांनी या अकाउंटला लाइक केले आहे. पोलीस आयुक्त जावेद अहमदसुद्धा हे @CPMumbaipolice या नावाने टिष्ट्वटरवर आले आहेत. त्यांनाही ३ हजार ७७१ जणांनी फॉलो तर २३ जणांनी लाइक केले आहे. हे दोन्ही हँडल अधिकृतरीत्या सुरू झाले आहेत. याआधी बंगळुरू पोलिसांनीही आपले ट्विटर अकाउंट सुरू केले होते. आता त्यात मुंबई पोलिसांची भर पडली आहे. लवकरच फेसबुक पेजवरही येणार नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी टिष्ट्वटरपाठोपाठ फेसबुकवरही येणार असल्याचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी सांगितले.‘बिग बी’सुद्धा फॉलोअर : मुंबई पोलिसांनी टिष्ट्वटरवर अकाउंट सुरू केल्यापासून क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसह अनेक सिनेतारकांनी त्यांचे स्वागत केले. अमिताभ बच्चन यांनी ३ ट्विट करून मुंबई पोलिसांचे या नव्या व्यासपीठावर स्वागत केले. हे अकाउंट नागरिक आणि पोलिसांना कनेक्ट करण्यास महत्त्वपूर्ण ठरेल. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीनागरिकांसाठी मुंबई पोलिसांनी मोलाचा पुढाकार घेतला आहे. यातून नागरिक आणि पोलिसांना एकत्रित जोडण्यास मदत होईल. - प्रियांका चोप्रानागरिकांसाठी मुंबई पोलिसांचे टिष्ट्वटरवर स्वागत आहे. हा प्रयत्न नागरिक आणि पोलिसांमध्ये संवाद साधण्यास महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. - फरहान अख्तर