शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

दत्ता पडसलगीकरांच्या रुपाने तब्बल ९ वर्षांनी मुंबईला लाभला मराठी पोलीस आयुक्त

By admin | Updated: January 29, 2016 18:33 IST

भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) ज्येष्ठ अधिकारी दत्तात्रय पडसलगीकर यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - सध्या केंद्र सरकारच्या सेवेत इंटेलिजन्स ब्युरोमध्ये (आयबी) नियुक्तीवर असलेले भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) ज्येष्ठ अधिकारी दत्तात्रय पडसलगीकर यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते उद्या पदभार स्वीकारणार आहेत. विद्यमान मुंबई पोलीस आयुक्त अहमद जावेद यांची जागा उद्यापासून पडसलगीकर घेणार आहेत. 
अहमद जावेद यांची सौदी अरेबियात भारतीय राजदूतपदी नियुक्ती झाली आहे. पडसलगीकर यांच्या रुपाने तब्बल ९ वर्षांनी मराठी व्यक्ती मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी विराजमान होत आहे. याआधी वर्ष २००७मध्ये डी.एन. जाधव हे मराठी पोलीस आयुक्त झाले होते. अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जा असलेले पडसलगीकर ‘आयबी’मध्ये विशेष संचालक पदावर प्रतिनियुक्तीवर होते. आयुक्तपदी नियुक्ती करताना त्यांना महासंचालक पदाच्या दर्जावर बढती दिली जाईल. पडसलगीकर ऑगस्ट २०१८मध्ये सेवानिवृत्त होणार असल्यामुळे त्यांना मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून पूर्ण कालावधी मिळणार आहे.
पडसलगीकर यांचे महाराष्ट्रात परत येणे ही अपवादात्मक बाब आहे. गुप्तचर खात्यात असा अलिखित नियम आहे की आयबीने ज्या अत्यंत कार्यक्षम अधिकाऱ्यांना प्रदीर्घ काळ सामावून घेतले आहे त्यांना राज्याचे पोलीस महासंचालक (कोणत्याही राज्यात पोलीस महासंचालक ही खूपच वरची जागा आहे) केले जाणार असेल तरच त्या अधिकाऱ्याला परत पाठविले जाते. मुख्यमंत्री फडणवीस हे पडसलगीकरांना आयबीतून महासंचालक पदावर घेण्यास यशस्वी ठरले आहेत, असे यातून दिसून येते.
प्रामाणिक व सचोटीचे अधिकारी म्हणून परिचित असलेले पडसलगीकर मूळचे सोलापूरचे. त्यांची प्रतिमा स्वच्छ असून, काम करून घेण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री होताच मुंबईच्या पोलीस आयुक्तपदासाठी पहिली पसंती पडसलगीकरांनाच होती; परंतु त्यांनीच ती नम्रपणे नाकारली व राकेश मारिया त्या पदावर कायम राहिले. दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पडसलगीकरांचा गुप्तचर खात्यातील अनुभव मुंबईसाठी फायदेशीर ठरणार आहे.