पुणो : राज्यात पावसाचा जोर वाढला असून, गेल्या 24 तासांत मुंबई, कोकणसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला पावसाने झोडपून काढल़े तर पुढील 24 तासांत मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आह़े
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रची तीव्रता मंगळवारी आणखी वाढली आणि ते उपसागराच्या वायव्य भागात स्थिर होते. त्याचबरोबर अरबी समुद्रात सोमवारी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या किनारपट्टीवर असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रची व्याप्ती आणि तीव्रता मंगळवारी आणखी वाढली. ते गुजरातपासून कर्नाटकर्पयत पसरले. या दोन्ही हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रंमध्ये राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळेच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला पावसाने झोडपून काढल़े यामुळे कोकण आणि विदर्भातील अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. तर पावसाची आस असलेल्या मराठवाडय़ातील काही भागांत गेल्या 24 तासांत पाऊस पडला, पण त्याची तीव्रता कमी होती.
मुंबई, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, अमरावती, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली आहे. (प्रतिनिधी)
ढगांनी तळ ठोकला; सलग तिस:या दिवशी संततधार
पावसाळी ढगांनी मुंबईत तळ ठोकला आह़े त्यामुळे सलग तिस:या दिवशी मुसळधार सरींनी शहर व उपनगरांना झोडपल़़े विश्रंती घेत पावसाचा हा खेळ सुरू राहिल्यामुळे मुंबईकरांना त्याची फारशी झळ बसली नाही़ मात्र काही इमारतींचा छोटाचा भाग कोसळणो आणि वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटनांनी टेन्शन वाढविल़े