शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईला मेट्रोची आवश्यकता आहे

By admin | Updated: June 9, 2017 05:08 IST

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईला मेट्रोची आवश्यकता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईला मेट्रोची आवश्यकता आहे. ३० वर्षांपूर्वीच मुंबईत मेट्रो यायला हवी होती, मात्र ती ३० वर्षे उशिराने येत आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने मेट्रो-३ प्रकल्पासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन प्रा. लि. (एमएमआरसीएल)ने खारफुटींची कत्तल करण्यासाठी केलेल्या अर्जावर आक्षेप घेणाऱ्या याचिकाकर्त्यांना चांगलेच सुनावले.‘आपल्याला मेट्रोची आवश्यकता आहे. मुंबईत अत्यंत वाईट पद्धतीने वाहतूककोंडी होत आहे,’ असे न्या. व्ही. एम. कानडे व न्या. ए. एम. बदार यांच्या खंडपीठाने म्हटले. प्रस्तावित वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स स्टेशनसाठी १०८ खारफुटींची कत्तल करण्याची परवानगी मिळावी, यासाठी एमएमआरसीएलने उच्च न्यायालयात अर्ज केला. यापूर्वी ‘बॉम्बे एन्व्हॉयरोन्मेंटल अ‍ॅक्शन ग्रुप’ या एनजीओने दाखल केलेल्या जनहित याचिकेत न्यायालयाने खारफुटीची कत्तल करण्यापूर्वी उच्च न्यायालयाची परवानगी घेणे सर्व प्रशासनांना बंधनकारक केले आहे. त्यामुळे एमएमआरसीएलनेही खारफुटींची कत्तल करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. स्टेशन बांधण्यासाठी जेवढ्या झाडांची कत्तल करण्यात येईल, तेवढी झाडे लावण्यात येतील, अशी हमी एमएमआरसीएलने उच्च न्यायालयाच्या अन्य खंडपीठाला दिली. आम्ही खारफुटीही लावू. मेट्रोसाठी नष्ट केलेला हरितपट्टा पुन्हा निर्माण करण्यात येईल, अशी हमी एमएमआरसीएलच्या वकील किरण बगालिया यांनी खंडपीठाला दिली.मात्र याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी यावर आक्षेप घेतला. ‘एनजीओने किंवा रहिवाशांनी यावर आक्षेप घेऊ नये. त्यापूर्वी मुंबईची स्थिती पाहणे आवश्यक आहे. दरदिवशी हजारो लोक उत्तर ते दक्षिण मुंबई असा प्रवास करतात. रस्ते अपघातात अनेक लोक मरतात. त्यामुळे दररोज दक्षिण मुंबईत येणाऱ्या हजारो लोकांना मेट्रो-३ उपयोगी ठरेल. प्रकल्पाला विरोध करणाऱ्या लोकांनी आधी मुंबईची स्थिती बघावी,’ असे खंडपीठाने म्हटले.एमएमआरसीएलने १०८ खारफुटींच्या ऐवजी ४ हजार खारफुटी अन्य ठिकाणी लावण्याची हमी न्यायालयाला दिली आहे. उच्च न्यायालयाने या अर्जावरील पुढील सुनावणी २४ जून रोजी ठेवली आहे. ।पुढील सुनावणी २४ जून रोजीझाडांच्या कत्तलीबाबत पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी आहे. परंतु व्यावहारिक विचार गरजेचे असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. एमएमआरसीएलने १०८ खारफुटींच्या ऐवजी ४ हजार खारफुटी अन्य ठिकाणी लावण्याची हमी न्यायालयाला दिली आहे. उच्च न्यायालयाने या अर्जावरील पुढील सुनावणी २४ जून रोजी ठेवली आहे.