शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-नाशिक महामार्ग ५ तास ठप्प

By admin | Updated: March 25, 2016 02:17 IST

उभ्या असलेल्या टॅँकरला धडक देऊन उलटलेल्या ट्रकमुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक तब्बल पाच तास ठप्प झाली होती. मुंबईहून नाशिककडे जाणारा टॅँकर बिघडल्याने २३

कसारा : उभ्या असलेल्या टॅँकरला धडक देऊन उलटलेल्या ट्रकमुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक तब्बल पाच तास ठप्प झाली होती. मुंबईहून नाशिककडे जाणारा टॅँकर बिघडल्याने २३ मार्च रोजी रस्त्यालगत उभा केला होता. त्या टॅँकरभोवती कुठल्याही प्रकारचे बॅरिकेड्स वा सिग्नल लावलेले नव्हते. गुरुवारी पहाटे ५.३०च्या सुमारास मुंबईहून नाशिककडे सळया घेऊन निघालेला ट्रक चढण चढत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने टँकरला धडकून उलटला. त्यामुळे मुंबई-नाशिक महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला. त्यानंतर, नाशिकहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न पोलिसांमार्फत करण्यात आला. परंतु, या मार्गावरही एक कंटेनर बंद पडल्याने वाहतूककोंडी झाली. पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने दोन्ही मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे ५ तास वाहतूक ठप्प होती.पोलीस यंत्रणा मेटाकुटीस :या अपघातानंतर झालेली वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पोलीस यंत्रणा मेटाकुटीस आली. महामार्गावर लहान गाड्यांची संख्या प्रचंड होती. प्रत्येक वाहनचालक मिळेल त्या जागेत गाडी घुसवत असल्याने कोंडी झाली होती. पहाटे ५.३० ते १०.३० या वेळेत ही कोंडी सोडविण्याचा पोलीस प्रयत्न करत होते.- सलग चार दिवस सुट्या आल्याने मुंबई व ठाण्यातील पर्यटक शिर्डी, नाशिक व अन्य ठिकाणी आपल्या कुटुंबीयांसह निघाले होते. मात्र, कसारा घाटालगतच वाहतूककोंडीमध्ये सुमारे ४ ते ५ तास खोळंबा झाल्याने पर्यटक-यात्रेकरूंचा हिरमोड झाला.