शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
3
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
4
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
5
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
6
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
7
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
8
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
9
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
10
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
11
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
12
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
13
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
14
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
15
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
16
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
17
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
18
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
19
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
20
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू

मुंबई महापौर कुस्तीमध्ये रंगला वाद

By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST

मुंबई महापौर कुस्ती स्पर्धेत पंचानी दिलेल्या चुकीच्या निर्णयाचा फटका पहिलवान नवनाथ इंगळेला बसल्याचा आरोप त्याच्या समर्थकांनी करीत चांगलाच हंगामा केला

महेश चेमटे,

मुंबई- मुंबई महापौर कुस्ती स्पर्धेत पंचानी दिलेल्या चुकीच्या निर्णयाचा फटका पहिलवान नवनाथ इंगळेला बसल्याचा आरोप त्याच्या समर्थकांनी करीत चांगलाच हंगामा केला. पंचानी दिलेल्या चुकीच्या निर्णयामुळे नवनाथचे ७४ किलो वजनी गटात अजिंक्यपद मिळविण्याचे स्वप्न धुळीस मिळून त्याला तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागल्याचा आरोप त्याच्या पाठीराख्यांनी केला. त्याचवेळी, यामध्ये आमची कोणतीही चूक नसल्याचे सांगत पंचांनी काहीही सांगण्यास नकार दिला.कुर्ला येथील सर्वेश्वर मैदानात मुंबई महापौर चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई महानगरपालिकेच्या व मुंबई उपनगर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या स्पर्धेत १३ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मल्लांनी सहभाग घेतला होता. उपांत्य फेरीत नवनाथ विरुद्ध अक्षय मोडक कुस्तीला वादाचे रंग लागले. एखादा मल्ल रोखून कुस्ती करत असेल आणि प्रतिस्पर्धी आक्रमक कुस्ती खेळत असेल तर रोखून कुस्ती खेळणाऱ्याला गुण दिला जातो. मात्र या लढतीत तीन वेळा अक्षय आक्रमक कुस्ती करत होता तर नवनाथ रोखून कुस्ती करत होता. तरीही पंचांनी तिन्ही वेळा अक्षयला गुण दिल्याचे नवनाथ समर्थकांचे म्हणणे आहे. कुस्ती संपल्यानंतर नवनाथच्या सहकाऱ्यांनी पंचाना कुस्तीची चित्रफीत दाखवली असता पंचांनी ही आमची चूक नसल्याचे सांगितले. मैदानावरील पंचांशी याबाबत विचारणा केली असता त्यांनीही ही माझी चूक नसल्याचे सागितले. त्यामुळे पंचांच्या चुकीमुळे नवनाथचे वर्ष वाया गेले, असा आरोप त्याच्या सहाकार्यांनी केला आहे.>मूळचा बार्शी येथे राहणारा नवनाथ इंगळे कोल्हापूरच्या न्यू मोतीराम तालीममध्ये कुस्तीचा सराव कतो. नवनाथ हा ‘डबल महाराष्ट्र केसरी’ चंद्रहार पाटील यांचा सहकारी आहे. नवनाथने पाटील यांच्याकडून कुस्तीचे डाव शिकून अनेक राष्ट्रीय मल्लांना चीतपट केले. >आम्ही कोणत्याही मल्लावर अन्याय करत नाही. जो चांगला खेळेल तोच जिंकेल. प्रत्येक वजनीगटातील मल्लांनी आपल्या ताकदीच्या बळावर आणि कुस्ती कौशल्यावर बाजी मारली. पराभवामुळे नाराज झाल्यानंतर मल्ल असा आरोप करीत असतात.- संपतराव साळुंखे, अध्यक्ष, मुंबई उपनगर जिल्हा तालीम संघ>...आणि ‘माउली’चा गजरखुल्या गटात सोलापूरच्या माउली जामदांडेने पुण्याच्या शिवराज राक्षेला १३-३ असे लोळवून महापौर चषकावर नाव कोरले. पंचांनी माउलीचा हात विजयी म्हणून उंचावताच प्रेक्षकांनी ‘माउली, माउली’ असा गजर सुरू केला. त्याचवेळी कुमार गटात पुण्याच्या ज्योतिबा आटकळेने बाजी मारली. ६५ किलो वजनी गटात सूरज कोकाटेने वर्चस्व राखले, तर ७४ किलो वजनी गटात पुण्याच्या अक्षय मोडकने विजय मिळवला. तर जेतेपदाच्या लढतीत वाद झाल्यानंतर नवनाथने पुण्याच्या रवि वरेला नमवूण तिसरे स्थान मिळवले.