शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईनेच मला घडवलं - रणबीर कपूर

By admin | Updated: April 11, 2017 22:53 IST

अभिनेता रणबीर कपूरला लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार-2017 मधील आऊटस्टॅडिंग एन्टरटेनर ऑफ द इयर (पुरुष) कॅटेगरीतील पुरस्काराने गौरविण्यात आले.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 11 - अभिनेता रणबीर कपूरला  लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार-2017 मधील आऊटस्टॅडिंग एन्टरटेनर ऑफ द इयर (पुरुष) कॅटेगरीतील पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर ‘कसं काय मुंबई’अशी साद रणबीरने घातली. मुंबईनेच मला घडवल, असे सांगत त्याने लोकमतचे विशेष आभार मानले.
 
पीएएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे.
 
 
हा सोहळा थेट पाहा फेसबुकवर...
 
‘लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर २०१७’च्या व्यासपीठावर  एकत्र आलेल्या आलिया भट्ट आणि रणबीर कपूरला लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी  बोलते केले. रणबीरने यावेळी आलियाची हायवेमधील भूमिका सर्वात जास्त आवडल्याचे सांगितले. 
 
ऋषी दर्डा यांच्या प्रश्नांना उत्तरे  देताना रणबीरने सिनेमामध्ये भरपूर बदल झाला असून, कपूर कुटुंबाचा भाग असल्यामुळे मी हे सर्व बदल बघितल्याचे सांगितले. प्रेक्षकसंख्या कमी झाली आहे. प्रेक्षक अन्य माध्यमांकडे वळले आहेत. सिनेमाचा आशय मजबूत हवा तरच प्रेक्षक पुन्हा चित्रपटगृहाकडे वळतील अस रणबीरने चित्रपट सृष्टीतील बदलांबाबत बोलताना सांगितले.
 
रणबीर सध्या संजय दत्तच्या आयुष्यावर येणा-या चित्रपटात संजयची भूमिका करत आहे. यासंबंधी या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना विचारले असता त्यांनी रणबीर 20 ते 55 वयोगटातील व्यक्तीची भूमिका करतोय. यासाठी तो  प्रचंड मेहनत घेत असल्याचे सांगितले. तो सकाळी तीन वाजता उठतो. त्याच्या मेकअपला पाच तास लागतात. त्यानंतर तो सलग 12 तास काम करतो, सेटवर येण्यासाठी त्याने कधीही लेट केलेला नाही. त्याच्याबरोबर काम करताना एक वेगळा आनंद मिळतोय असे हिरानी यांनी सांगितले. 
 
कपूर खानदानसारखं अभिनय आणि कलेचे मोठं विद्यापीठ असलेल्या घरात त्याचा जन्म झाला. आपल्या दिग्गजांकडून मिळालेला अभिनयाचा वारसा चालवण्यासाठी ‘सावरियाँ’ बनून तो रुपेरी पडद्यावर अवतरला. आपल्या पहिल्याच सिनेमासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवत ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांच्या लेकानं रसिक आणि तरुणाईवर गारुड घालण्यास सुरुवात केली. पहिल्याच सिनेमात मिळालेल्या यशानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. रुपेरी पडद्यावर वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारा आणि तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनलेला हा अभिनेता म्हणजे रणबीर कपूर. ‘सावरियाँ’ सिनेमाला मिळालेल्या यशानंतर ‘बचना ऐ हसीनो’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’, ‘वेकअप सिड’, ‘रॉकेट सिंग’, ‘रॉकस्टार’, ‘बर्फी’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘बेशरम’, ‘बॉम्बे वेल्वेट’, ‘तमाशा’, ‘ऐ दिल है मुश्किल’ अशा सिनेमांमधून आपल्या अभिनयानं तरुणाईची मनं जिंकली.
 
आजच्या घडीला तरुणींचा लाडका अभिनेता म्हणून रणबीर कपूर प्रसिद्ध आहे. आज रसिक त्याच्या आगामी सिनेमाची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळेच त्याच्या या अफाट लोकप्रियतेचा गौरव करण्यासाठी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार-2017 मधील आऊटस्टॅडिंग एन्टरटेनर ऑफ द इयर (पुरुष) कॅटेगरीतील पुरस्काराने रणबीरला गौरवण्यात आले.
 
 
ज्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले, इथल्या मातीची शान वाढविली आणि इथे प्रगती घडवून आणली अशा १४ क्षेत्रांतील मान्यवरांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी लोकमतने उचललेले पाऊल हे आता केवळ सोहळा नव्हे, तर गौरवशाली परंपरा बनू पाहात आहे.
 
लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या ११नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे. जाहीर झालेली नामांकने, त्यावर जगभरातील वाचकांनी भरभरून दिलेली मते या पार्श्वभमीवर तब्बल साडेतीन तासांच्या विचार मंथनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ११ नामवंत ज्युरींनी विजेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. 
 
‘लोकमत’ने केलेल्या मंथनातून जाहीर झालेली १४ कॅटेगरीतील नामांकने आणि लोकमताचा कौल यावर अंतिम निवडीचा साज चढविण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडणाऱ्या ज्युरी मंडळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, डॉ. प्रकाश आमटे, अर्णव गोस्वामी, मिलिंद देवरा, महेश भट्ट, विक्रम लिमये, विक्रम श्रॉफ, सुनील सूद, डॉ. रमाकांत पांडा, विजय दर्डा आणि मृणाल कुलकर्णी यांचा सहभाग आहे.
 
यंदा मोलाची भर...: आता चौथ्या पर्वात "लोकसेवा-समाजसेवा", "परफॉर्मिंग आर्ट्स", "कला", "क्रीडा", रंगभूमी, मराठी चित्रपट, "उद्योग", ‘पायाभूत सेवा’, "राजकारण", "प्रशासन (आश्वासक)" यातील एकंदर १३ कॅटेगरींसह "वैद्यकीय" क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या १४ पुरस्कारांच्या व्यतिरिक्त स्पर्धेच्या पलीकडे जाणारे उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेल्या सहा महनीय व्यक्तींना विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.
 
नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४  कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.
 
 
सर्व पुरस्कारांच्या माहितीसाठी क्लीक करा