शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांना आंघोळ करणे वाटते शिक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2016 23:45 IST

इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीतील-मुंबई (आयआयटी-बी) दर दहा विद्यार्थ्यांपैकी सहा जण दोन किंवा तीन दिवसांतून एकदाच आंघोळ करतात

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 1-  इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीतील-मुंबई (आयआयटी-बी) दर दहा विद्यार्थ्यांपैकी सहा जण दोन किंवा तीन दिवसांतून एकदाच आंघोळ करतात. कारण तो त्यांना जाच वाटतो. दहा टक्के विद्यार्थी आठवड्यातून एकदाच तर ३० टक्के विद्यार्थी मात्र रोज आंघोळ करतात. आयआयटी-मुंबईतील वरिष्ठ विद्यार्थ्यांनी केलेल्या पाहणीच्या दुसऱ्या टप्प्यातील हे निष्कर्ष आहेत.

या पाहणीतील प्रश्नांना शिकत असलेल्या, दोन पदव्या प्राप्त केलेल्या, एमएस्सी आणि एम टेक पदवीप्राप्त केलेल्या ३३२ विद्यार्थ्यांनी उत्तरे दिली होती. पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये वसतिगृहातील जगण्याची नशा (हँगओव्हर) पुढेही काही काळ टिकून राहते. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ४० टक्के विद्यार्थ्यांनी मित्रांसोबत राहण्याचे ठरविले होते. २७ टक्क्यांनी घरी जायला पसंती दिली आणि एकट्याने राहण्याचा निर्णय १९ टक्के विद्यार्थ्यांनी घेतला होता. दुसरीकडे ६६ टक्के विद्यार्थ्यांनी आपापल्या गावी नातेवाईकांशी घनिष्ट संबंध व संपर्क ठेवला होता तर २९.८ टक्के विद्यार्थ्यांनी पालकांशी सरासरीपेक्षाही कमी संबंध ठेवला होता. प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे खास स्वप्न असते ते म्हणजे मित्रांसोबत रस्त्याने गोव्याला जायचे. मुंबईत असे स्वप्न ५२.४ टक्के विद्यार्थ्यांनी साकारले होते.

७० टक्के विद्यार्थ्यांनी लोकल ट्रेनने विनातिकीट प्रवास केला होता तर जेम्स बाँडच्या ‘कॅसिनो रोयाल’ या चित्रपटावरून प्रेरणा घेऊन पोकर किंवा ब्लॅकजॅक खेळाचा आनंद ५५.७ टक्के विद्यार्थ्यांनी घेतला होता. लग्न करण्यावर ३९.१५ टक्के विद्यार्थ्यांना पाच वर्षे तरी आपणच आपल्यासाठी खड्डा न खोदण्यास पसंती दिली होती. ३१ टक्क्यांनी या विषयावर काहीच सांगितले नाही तर २१.४ टक्के विद्यार्थ्यांनी तीन ते पाच वर्षांत लग्न करायचे सांगितले होते. धार्मिक श्रद्धेच्या प्रश्नावर ३९ टक्के विद्यार्थी आम्ही श्रद्धावान असल्याचे तर आम्ही नास्तिक असल्याचे २१ टक्क्यांनी व ३९ टक्क्यांनी आम्ही अज्ञेयवादी (ईश्वराच्या अस्तित्वाचे ज्ञान आपणाला नाही असे मानणारा-अग्नॉस्टिक) असल्याचे सांगितले होते.