शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, मला तुझ्यावर भरोसा आहे ! RJ मलिष्काचा मनपाला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 13:34 IST

मुंबई महापालिकेच्या कारभारावर "मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का?" या गाण्यातून ताशेरे ओढणा-या सुप्रिद्ध आर.जे. मलिष्कानं पुन्हा एकदा मनपाला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - मुंबई महापालिकेच्या कारभारावर "मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का?" या गाण्यातून ताशेरे ओढणा-या सुप्रिद्ध आर.जे. मलिष्कानं पुन्हा एकदा मनपाला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. 
 
"मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय?", या गाण्यातून पावसाळ्यात होणारी मुंबईची दैनावस्था मांडली होती. यामुळे मलिष्का सध्या मुंबई मनपाच्या रडारवर असल्याचे दिसत आहे.  याच पार्श्वभूमीवर आर जे मलिष्काने मुंबई मनपाला आणखी एक टोला लगावला आहे. या सर्व घटनाक्रमादरम्यान,  मुंबईकर मलिष्काला पूर्णपणे पाठिंबा देत आहे. 
 
यासंदर्भात मलिष्काने ट्विट करुन मुंबईकरांचे, मुंबईचे आभार मानले आहेत. ""मला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. तुम्ही खूप चांगले आहात. मुंबई, तू बेस्ट आहेस. मला तुझ्यावर भरोसा आहे"", असे ट्विट मलिष्कानं केले आहे.  
 
आणखी बातम्या वाचा
(RJ मलिष्काच्या घरात डेंग्यूच्या अळ्या, मुंबई मनपानं बजावली नोटीस)
 
तर दुसरीकडे महापालिकेच्या अधिका-यांनी मलिष्का राहत असलेल्या इमारतीची मंगळवारी (18 जुलै )तपासणी केली. यावेळी महानगरपालिकेच्या अधिका-यांना तपासणीदरम्यान मलिष्काच्या घरात डेंग्यूच्या अळ्या आढळल्या आहेत. याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेनं मलिष्काला नोटीस बजावली आहे. 
 
वांद्रे पश्चिमेकडील पाली नाका येथील सन राईज इमारतीमध्ये बुधवारी एच वेस्ट वॉर्ड कार्यालयाच्या अधिका-यांनी तपासणी केली असता लिली मेंडोंसा यांच्या घरात डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. शोभेच्या कुंडीखाली ठेवलेल्या डिशमध्ये साठलेल्या पाण्यात या अळ्या सापडल्या. लिली मेंडोंसा ( ६५ वर्ष) म्हणजे मलिष्काची आई असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याप्रकरणी नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केली आहे.
 
पालिकेनं बजावली नोटीस
डेंग्यूच्या अळ्यांची पैदास होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी यासाठी पालिका जनजागृती करत असतानाही सुशिक्षितांच्या घरात कशी बेफिकिरी असते याचे उदाहरण मलिष्काने दिले आहे. या प्रकरणी एच वॉर्ड कार्यालयाने लिली यांना नियमानुसार नोटीस बजावली आहे.
 
दरम्यान, यापूर्वी मलिष्काच्या ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का?’  गीतामुळे महापालिकेचीच नव्हे तर मुंबई शहराची जागतिक स्तरावर बदनामी होत आहे. त्यामुळे मलिष्कावर कायदेशीर कारवाई करीत तिच्या विरोधात ५00 कोटी रुपयांचा दावा महानगरपालिकेने दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेने पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे केली होती. आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन त्याबाबत विधि खात्याचे मत मागविल्याचे सूत्रांकडून समजते. 
 
‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का?’ हे गीत काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यात रेडिओ जॉकी मलिष्का ‘मुंबईत पाणी तुंबतं, रेल्वे सेवा लेट होते’, ‘मुंबईत खड्डे पडतात आणि पावसात पालिकेची पोलखोल होते’ असे गीताद्वारे सांगते आहे. पहारेकरी आधीच दबा धरून बसले असताना हे गाणे म्हणजे भाजपाच्या हाती आयते कोलीत आल्यासारखे आहे. त्यामुळे मलिष्कावर कारवाईची मागणी करीत प्रतिस्पर्ध्यांचे तोंड बंद करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न सुरू आहे. 
 
त्यानुसार शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले व समाधान सरवणकर यांनी आयुक्तांची मंगळवारी ( 18 जुलै ) त्यांच्या दालनात भेट घेतली. या गीतामुळे महापालिकेचीच नव्हे तर संपूर्ण मुंबई शहराची प्रतिष्ठा मलिन झाली आहे. मुंबईविषयी चुकीचा संदेश पसरवणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आयुक्तांकडे केली असल्याचे नगरसेवक अमेय घोले यांनी सांगितले, याची दखल घेऊन आयुक्तांनी विधि खात्याकडे याविषयी मत मागितले आहे.