शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस रुळावरून घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:13 IST

गेले तीन दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे लोणावळ्यात मंकी हिल येथे सब स्टेशनजवळ मंगळवारी दरड कोसळली. यामुळे रेल्वे रुळाच्या खाली

- लोकमत न्यूज नेटवर्कवावोशी/खोपोली : गेले तीन दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे लोणावळ्यात मंकी हिल येथे सब स्टेशनजवळ मंगळवारी दरड कोसळली. यामुळे रेल्वे रुळाच्या खाली असणारा सिमेंटचा खांब घसरला. तसेच एक मोठा दगड रुळावर आल्याने दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मुंबईकडून हैदराबादला जाणारी रेल्वे रुळावरून घसरून अपघात घडला. यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत होऊन हा मार्ग बंद करण्यात आला. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या कर्जतमध्ये थांबविण्यात आल्या. साडेतीन तास दुरुस्ती केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.मुंबई-पुणे हा रेल्वेमार्ग कर्जतला जोडलेला असल्याने कर्जत व लोणावळा या दोन शहरांच्या मध्यभागातील डोंगरांमधून जाणारी रेल्वे खोपोलीमधून जाते. या मार्गावर मोठा दगड आल्याने रेल्वे रुळावरून घसरली. अपघातानंतर मुंबईतून पुणेमार्गे इतर राज्यात जाणाऱ्या रेल्वे कर्जत येथे थांबण्यात आल्या. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबई - कन्याकुमारी एक्स्प्रेस कल्याणला, मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस वांगणी येथे, मुंबई-नांदेड कर्जतला थांबविण्यात आली. तर डेक्कन, प्रगती एक्स्प्रेस कर्जतला थांबवली. अन्य घाटामध्ये ज्याप्रमाणे दरड प्रतिरोधक लोखंडी जाळ्या बसविल्या आहेत त्याचप्रमाणे ठाकूरवाडी, खंडाळा घाटात बसविण्यात याव्यात. जेणेकरून संभाव्य अपघात टळतील, असे रेल्वे पॅसेंजर असोसिएशनच्या पंकज ओसवाल यांनी सांगितले. पुण्याकडे जाणाऱ्या खोळंबलेल्या गाड्या सिंहगड एक्स्प्रेस(४.१५) कोणार्क एक्स्प्रेस(५.००) भुवनेश्वर एक्स्प्रेस (५.१५) कन्याकुमारी एक्स्प्रेस (५.३०) प्रगती एक्स्प्रेस (६.००) डेक्कन क्वीन (६.४०) सह्याद्री एक्स्प्रेस (७.५०)