शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
5
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
6
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
9
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
10
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
11
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
12
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
13
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
14
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
15
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
16
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
17
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
18
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
19
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
20
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा

स्मार्ट सिटीला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 23:33 IST

चुकीच्या पद्धतीने नोटिसा बजावल्याने मुंबई उच्च न्यायालयाने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रस्ता रूंदीकरणाबाबत रहिवासी-व्यापाºयांची भूमिका उचलून धरल्याने पालिकेच्या स्टेशन परिसर सुधारणा खोळंबण्याची भीती आहे

अनिकेत घमंडी डोंबिवली : चुकीच्या पद्धतीने नोटिसा बजावल्याने मुंबई उच्च न्यायालयाने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रस्ता रूंदीकरणाबाबत रहिवासी-व्यापाºयांची भूमिका उचलून धरल्याने पालिकेच्या स्टेशन परिसर सुधारणा खोळंबण्याची भीती आहे. तसेच ज्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचा हा भाग होता त्या प्रकल्पालाही धक्का बसला आहे. यात पालिकेचा निष्काळजीपणा, धोरणातील विसंगती, त्याच्या अंमलबजावणीतील भोंगळपणा जसा उघड झाला; तशीच स्मर्टा सिटी प्रकल्प राबवणाºया सत्ताधाºयांनीही नागरिकांना विश्वासात न घेण्याची वृत्ती भोवल्याचे दिसून आले.मार्गदर्शक नियमांचे पालन करत पालिकेने रस्ता रूंदंीकरणाचा निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने म्हटले आहे. या निर्णयामुळे जरी रहिवासी-व्यापाºयांना दिलासा मिळाला असला, तरी पालिकेपुढील स्मार्ट सिटीच्या वाटचालीतील अडथळे स्पष्ट झाले आहेत. न्यायालयाच्या आदेशांनुसार पुढील निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात जो वेळ लागेल त्याचा फटका विकासकामांना बसण्याची शक्यता आहे.शहरातील-खास करून स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेने रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव आणला होता. मात्र त्याला ठिकठिकाणच्या रहिवाशांनी आणि व्यापाºयांनी विरोध केल्याने हे प्रकरण वर्षभरापासून उच्च न्यायालयात प्रलंबित होते. त्याचा निकाल मंगळवारी लागला. त्यात केळकर रोडवरील रहिवाशी-व्यापारी संघाचाही समावेश होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, रस्ता रुंदीकरणात २३ इमारतींपैकी बहुतांशी ठिकाणी पिलर तोडावे लागणार असल्याने अनेक इमारती तोडून पुन्हा बांधण्याची वेळ येणार होती. त्यातही आधी केलेल्या रूंदीकरणाच्या कारवाईवेळी पालिकेने दिलेली आश्वासने न पाळल्याचा आक्षेप होता. पश्चिमेतील दिनदयाळ रोड, कल्याणमधील मलंग पट्टा व अन्य ठिकाणच्या रस्त्यांत बाधित होणाºयांची बाजू ठाण्यातील प्रख्यात वकील सुहास ओक व त्यांचे सहकारी सागर जोशी यांनी मांडली होती. त्यांचा विचार करून न्यायालयाने प्रक्रिया राबवण्याच्या त्रुटींवर बोट ठेवले.पालिकेचे शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता आताच प्रतिक्रिया देता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.तोडगा नक्की निघेल : महापौरस्मार्ट सिटीमधील विविध कामांत रेल्वे स्थानक परिसर सुधारणा हा एक महत्वाचा मुद्दा होता. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पुन्हा नियमानुसार कारवाई करावी लागणार असल्याने त्यात वेळ जाणार आहे. त्यामुळे विकास कामांसंदर्भात जे महापालिकेचे उद्दीष्ट आहे ते पूर्ण होण्यास वेळ लागेल. यात वेळ जाईल, पण तोडगा नक्की निघेल, असा विश्वास महापौर राजेंद्र देवळेकर यांनी व्यक्त केला.स्थायीचे ठराव रद्दस्थायी समितीने १ आॅक्टोबर २०१६ मध्ये केलेले ठराव उच्च न्यायालयाने अवैध ठरवलेले आहेत. स्थायीला असलेले अधिकार त्यांनी दुसºयांना देण्याची कायद्यात तरतूद नाही. पुढे कायद्याचे पालन करुन यापुढील कारवाई करण्यात येईल, असे पालिकेचे वकील ए. एस. राव यांनी सांगितले.पालिकेची नाचक्कीपालिकेकडे सक्षम अधिकारी नसल्याने ही समस्या उद्भवली. लोकप्रतिनिधींच्या अधिकाराकडे प्रशासनाने कानाडोळा केल्याचे यातून स्पष्ट झाले. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे महापालिकेची नाचक्की झाली आणि नागरिकांचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे, अशी टीका प्रसिद्ध वास्तुविशारद राजीव तायशेट्ये यांनी केली.अधिकाºयांनाही दोषी धरापालिकेचे अनेक निर्णय अधिकाºयांच्या नाकर्तेपणामुळे खोळंबले आहेत. आताही ज्या अदिकाºयांनी रस्ते रूंदीकरणाच्या नोटिसा चुकीच्या पद्धतीने बजावल्या, त्या अधिकाºयांवर कारवाई करण्याची गरज आहे. तसेच सत्ताधारी शिवसेनेलाही या घोळाची जबाबदारी टाळता येणार नाही, असे विरोधी पक्षातील नगरसेवकांचे म्हणणे आहे. स्थायीचा निर्णय चुकला असेल तर तो दुरूस्त करण्याची संधी अधिकाºयांनी का घेतली नाही, याचेही उत्तर द्यावे लागेल असे त्यांचे म्हणणे आहे.स्थायीला अधिकारवापरावे लागतीलन्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करणे योग्य नाही. मात्र गेले दीड वर्ष जे प्रकरण प्रलंबित होते, त्यात आता स्थायी समितीला स्वत:चे अधिकार वापरावे लागतील. त्यानंतरच या प्रकरणाची पुढील दिशा निश्चित होईल, अशी प्रतिक्रिया पालिकेतील विरोधी पक्षनेता मंदार हळबे यांनी व्यक्त केली.अ‍ॅड. सागर जोशी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार महापालिकेने ज्या पद्धतीने रहिवासी-व्यापाºयांना रस्ता रुंदीकरणाच्या नोटिसा दिल्या, त्याची पद्धत चुकली होती. त्यासाठी नियमानुसार जावे लागते. ती पद्धत प्रशासनाने न पाळल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. पालिकेने नियमांचे पालन करत रितसर नोटिसा द्याव्यात अथवा पुढील निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे पुढील निर्णय सर्वस्वी पालिकेसह स्थायी समितीचा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.