शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

‘बॉम्बे हायकोर्ट’चे होणार मुंबई हायकोर्ट

By admin | Updated: January 19, 2015 04:50 IST

मुंबई आणि मद्रास या देशातील दोन आद्य उच्च न्यायालयांची अजूनही कायम असलेली ‘बॉम्बे हायकोर्ट’ व ‘मद्रास हायकोर्ट’ ही ब्रिटिशकालीन नावे बदलून

नवी दिल्ली : मुंबई आणि मद्रास या देशातील दोन आद्य उच्च न्यायालयांची अजूनही कायम असलेली ‘बॉम्बे हायकोर्ट’ व ‘मद्रास हायकोर्ट’ ही ब्रिटिशकालीन नावे बदलून त्यांचे त्या त्या शहरांच्या मूळ नावांनुरूप अनुक्रमे ‘मुंबई हायकोर्ट’ आणि ‘चेन्नई हायकोर्ट’ असा नामबदल करण्याची मागणी मान्य होण्याच्या मार्गावर आहे.१९९० च्या दशकात ‘बॉम्बे’चे अधिकृतपणे ‘मुंबई’ झाले व मद्रास ‘चेन्नई’ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानुसार या शहरांमधील अनेक संस्थांच्या नावांमध्ये बदल केले गेले, पण तेथील उच्च न्यायालयांची नावे मात्र ‘बॉम्बे’ व ‘मद्रास’ अशीच कायम राहिली. आता या दोन्ही उच्च न्यायालयांच्या नावांमध्ये त्या त्या शहरांच्या मूळ नावानुरूप बदल करण्यासाठी संसदेत कायदा करण्याची केंद्रीय कायदा मंत्रालय तयारी करीत असल्याचे वृत्त आहे. यासाठी विधेयकाचा मसुदा तयार केला जात आहे. हा कायदा संमत झाल्यावर १९९५ मध्ये ‘बॉम्बे’चे मुंबई झालेल्या या शहरातील ऐतिहासिक उच्च न्यायालयही ‘मुंबई हायकोर्ट’ असे नाव अभिमानाने मिरवील.तीन चार्टर्ड हायकोर्टभारताची सत्ता कंपनी सरकारकडून ब्रिटिश सम्राज्ञीच्या हाती गेल्यावर तेथील संसदेने १८६१ मध्ये ‘इंडियन हायकोर्ट अ‍ॅक्ट’ हा कायदा करून भारतीय वसाहतीसाठी उच्च न्यायालये स्थापण्याचे अधिकार राणीला दिले. त्यानुसार सर्वप्रथम १ जुलै १८६२ मध्ये कलकत्ता हायकोर्ट सुरू झाले. त्यानंतर दीड महिन्याने १४ आॅगस्ट १८६२ मध्ये मुंबई उच्च न्यायालय सुरू झाले. मद्रास हायकोर्टही त्याच सुमारास सुरू झाले. भारतीय राज्यघटना अमलात आली तेव्हा देशत ही तीनच उच्च न्यायालये होती. जी उच्च न्यायालये स्थापन झाली त्यांना त्या त्या राज्यांची नावे दिली गेली. पण आधीपासून अस्तित्वात असलेल्या तीन उच्च न्यायालयांची त्या त्या शहरांनुरूप असलेली इंग्रजी नावे नंतरही तशीच कायम राहिली. पूर्वी मध्य प्रांताचे उच्च न्यायालय नागपूरात होते. संयुक्त महाराष्ट्र स्थापन होताना नागपूर उच्च न्यायालय हे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ झाले. कालांतराने १९८६ मध्ये प्रशासकीय सोयीसाठी मराठवाडा व धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी औरंगाबाद खंडपीठ सुरू केले गेले.(लोकमत न्यूज नेटवर्क)