शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

चंदीगढचे हृदय मुंबईला !

By admin | Updated: June 5, 2017 05:13 IST

५१ वी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया आणि चौथे फुप्फुस प्रत्यारोपणही यशस्वीरीत्या पार पडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतील हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रियेने नुकतेच अर्धशतक पूर्ण केले असून त्यानंतर आता ५१ वी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया आणि चौथे फुप्फुस प्रत्यारोपणही यशस्वीरीत्या पार पडली आहे. चंदीगढच्या ४० वर्षीय व्यक्तीला ब्रेनडेड घोषित केल्यावर, त्यांच्या पत्नीचे सुमपदेशन केल्यानंतर, कुटुंबीयांच्या परवानगीने अवयवदान करण्यात आले. चंदीगढहून विमानाद्वारे २ तास ३८ मिनिटांत हृदय मुंबईला आणण्यात आले. या दात्याने हृदयासह फुप्फुसे, यकृत, मूत्रपिंड आणि नेत्रदानही केले आहे.मुलुंड येथील रुग्णालयात पार पडलेल्या या हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रियेत डोंबिवलीच्या ४३ वर्षीय व्यक्तीस हृदय प्रत्यारोपित करण्यात आले. हा रुग्ण डायलेटेड कार्डिओमायोपथीने ग्रस्त असल्याचे निदान करण्यात आले होते. गेल्या ३७ दिवसांपासून तो रुग्ण हृदयासाठी प्रतीक्षायादीत होता, तर इंदूरच्या ५५ वर्षीय महिला रुग्णास फुप्फुस प्रत्यारोपित करण्यात आले. या रुग्णास अखेरच्या फुप्फुसांचा विकार असून, दोनहून अधिक आठवडे यांचे नाव प्रतीक्षायादीत होते. याबरोबरच दात्याने केलेले नेत्रदान नेत्रपिढीकडे सुपुर्द करण्यात आले आहे, अशी माहिती हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया चमूचे प्रमुख डॉ. अन्वय मुळे यांनी दिली.चंदीगढ येथील पोस्टग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च येथून सकाळी ११ वाजून २ मिनिटांनी तेथील चमू निघाला. त्यानंतर, १ वाजून १५ मिनिटांनी मुंबईला हा चमू पोहोचला. गेल्या काही महिन्यांपासून आईची प्रकृती अत्यंत नाजूक होती. त्यामुळे आम्ही दात्याच्या शोधात होतो. आता मात्र, या फुप्फुस प्रत्यारोपणाने खूप समाधानी आहोत, अशी भावना फुप्फुस प्रत्यारोपित करण्यात आलेल्या रुग्णाच्या मुलीने व्यक्त केली.दात्याचे हृदय मुंबईत २ तास ३८ मिनिटांत पोहोचले, तसेच दात्याने हृदयासह फुप्फुसे, यकृत, मूत्रपिंड आणि नेत्रदानही केले आहे.