शहरं
Join us  
Trending Stories
1
मामाच्या नावाने हगवणेंनी स्वतःचे खिसे भरले; कस्पटेंकडून रुखवतासाठी १ लाखांचा चेक अन् ५० हजार घेतले
2
तिघांची एकत्र चौकशी करायची आहे; निलेशसहीत सासरा, दीर यांनाही ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
3
'आम्ही त्यांना बोलावले नाही, शाहिद आफ्रिदी अन् उमर गुल स्वतःहून आले'; आयोजकांनी मागितली माफी
4
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांचे वडील अयोध्येत येणार; राम लल्लांचे दर्शन घेणार
5
पोहताना दमछाक होऊन ४ शाळकरी मुलांचा तळ्यात बुडून मृत्यू; नातेवाईकांनी फोडला टाहो, चाकणमधील घटना
6
अवघ्या ३१ व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्याने केली होती आत्महत्या, गर्लफ्रेंडला पोलिसांनी ठोकलेल्या बेड्या
7
Viral Video: ढोल- ताशाच्या तालावर महिलांचा हटके डान्स, थेट जमिनीवर लोळल्या; व्हिडीओ व्हायरल!
8
राहुल गांधींना धक्का, मानहानीच्या खटल्यात ती मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळली
9
पुन्हा थैमान घालणार कोरोना? देशभरात 24 तासांत 685 नवे रुग्ण, 4 जणांचा मृ्त्यू; सक्रिय रुग्णांचा आकडा 3395 वर!
10
...अन् पोलिसवाल्यानं भरून काढली 'आर्मी मॅन'ची कमी! कोण आहे भालाफेकमधील भारताचा नवा 'बाहुबली'?
11
पाकिस्तानने भारताची ६ लढाऊ विमाने पाडली? सीडीएस अनिल चौहान यांनी सगळंच सांगितलं
12
Devendra Fadnavis : "अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर चित्रपट तयार करणार"; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
13
भाजपाकडून राज्यातील उर्वरित जिल्हाध्यक्षांची घोषणा, २२ नेत्यांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी 
14
'लँड फॉर जॉब' प्रकरणी लालू प्रसाद यादवांना झटका! दिल्ली उच्च न्यायालयाने कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला
15
"राज्यात तब्बल १ लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा संशय, सर्व मोठ्या प्रकल्पांची न्यायालयीन चौकशी करा’’, काँग्रेसची मागणी 
16
IND vs ENG : नायर ऑन फायर! इंग्लंडमधील द्विशतकी खेळीसह पठ्ठ्यानं किंग कोहलीच्या जागेवर टाकला 'रुमाल'
17
बाबा, काहीही कर पण आमची नोकरी सोडू नको, ८५० कोटी देतो...; गुगलने दिली होती या भारतीयाला ऑफर, आजही...
18
३४ षटकांनंतर नवा चेंडू, ५ बॅकअप खेळाडू, क्रिकेटमधील हे नियम आता बदलणार, ICCने दिली मान्यता
19
तंत्र विद्यामध्ये तज्ज्ञ, अनेक YouTubers सोबत संबंध...; पाकिस्तानला भेट देणाऱ्या गुप्तहेर कासिमची संपूर्ण कुंडली
20
गँगस्टर मुख्तार अन्सारीच्या आमदारपुत्राला दोन वर्षांची शिक्षा; आमदारकी गेली, प्रक्षोभक वक्तव्य भोवले

मुंबईची सहा महिन्यांच्या पाण्याची तजवीज झाली

By admin | Updated: July 19, 2016 05:20 IST

जुलैच्या पंधरवड्यातच प्रमुख तलावांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक जलसाठा जमा झाला आहे़ तुळशी तलाव लवकरच भरून वाहण्याचीही शक्यता आहे़

मुंबई : जुलैच्या पंधरवड्यातच प्रमुख तलावांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक जलसाठा जमा झाला आहे़ तुळशी तलाव लवकरच भरून वाहण्याचीही शक्यता आहे़ त्यामुळे गेले वर्षभर सुरू असलेली पाणीकपात रद्द होण्याची चिन्हे आहेत़काही वर्षांपासून पावसाचा ट्रेंड बदलला आहे़ गेली दोन वर्षे तलाव क्षेत्रात अपुरा पाऊस होत होता़ जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस पडतो़ मात्र गेल्या वर्षी जुलै महिना संपूर्ण कोरडा गेला़ त्यामुळे मुंबईत पाणीबाणीची स्थिती निर्माण होऊन आॅगस्ट २०१५ पासून २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली़ तलावांमध्ये चांगला जलसाठा जमा होईपर्यंत ही कपात मागे न घेण्याची भूमिका पालिका प्रशासनाने घेतली़ त्यात जून महिना कोरडा गेल्यामुळे पाणीकपातीमध्ये वाढ होण्याचे संकेत होते़ अखेर जुलै महिन्यात पावसाळी ढग तलावांकडे परतले़ सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे तलावांची पातळी झपाट्याने वाढली़ त्यामुळे पुढचे सहा महिने तरी पाण्याची काळजी मिटली आहे. पुढचे वर्ष निवडणुकीचे असल्याने ही कपात रद्द करून घेण्यासाठी राजकीय पक्षांकडून दबाव वाढत आहे़ तलावांची स्थितीही समाधानकारक असल्याने पाणीकपातीचा टक्का कमी होण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)