शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या धर्तीवर मुंबईचा आता एकच अर्थसंकल्प

By admin | Updated: January 24, 2017 04:26 IST

मुंबईत शिवसेनेची पुन्हा सत्ता आली तर बेस्ट या परिवहन सेवेचा वेगळा अर्थसंकल्प न मांडता महापालिकेच्या अर्थसंकल्पातच

मुंबई : मुंबईत शिवसेनेची पुन्हा सत्ता आली तर बेस्ट या परिवहन सेवेचा वेगळा अर्थसंकल्प न मांडता महापालिकेच्या अर्थसंकल्पातच तो समाविष्ट केला जाईल, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी जाहीर केले. केंद्र सरकारने रेल्वे अर्थसंकल्प मोडीत काढला त्या धर्तीवर हा निर्णय असल्याने शिवसेनेच्या वचननाम्यावर ‘मोदी’छाप असल्याची चर्चा आहे. मुंबईच्या परिवहन सेवेसह विकासाच्या विविध कामांचे एकत्रितपणे नियोजन करता यावे म्हणून ही भूमिका आपण घेतली असून, त्यामागे ‘बेस्ट’ची स्वायत्तता संपविण्याचा कुठलाही विचार नाही, असे ठाकरे यांनी सेना भवनातील पत्र परिषदेत सांगितले. महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे ‘बेस्ट’च्या कर्मचाऱ्यांनाही विम्याचे संरक्षण दिले जाईल, रेल्वे स्थानकांपासून दूर राहणाऱ्या नागरिकांसाठी छोट्या आकाराच्या ‘बेस्ट’ बसेस सुरू करण्यात येतील, असे ते म्हणाले. आरे कॉलनीत मेट्रो कारशेड उभारण्यास ठाकरे यांनी तीव्र विरोध दर्शविला. तसे केल्याने मोठा परिसर पावसाळ्यात पाण्याखाली जाईल आणि आज निर्णय करणारे लोकांचे हाल होताना काय करतील, असा सवाल त्यांनी केला. ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सर्व सदनिकांना मालमत्ता कर माफ, ७०० चौ. फुटांवरील सदनिकाधारकांसाठी विशेष योजनेचा त्यांनी पुनरुच्चार केला. (विशेष प्रतिनिधी)भाजपाच्या बाजारांना शिवसेनेचा पर्यायपणन विभागामार्फत शेतकरी बाजार ही संकल्पना राबविली जात असून, ती अनेक ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हायजॅक केली आहे. आज शिवसेनेच्या वचननाम्यात राज्यभरातून शेतकऱ्यांनी आणलेल्या मालाच्या विक्रीसाठी मुंबईत बाजारांची उभारणी केली जाईल, असे म्हटले आहे.मुख्यमंत्र्यांकडून आधीच घोषणाउद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केलेल्या वचननाम्यातील काही घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच केल्याचे स्पष्ट दिसते. त्यात बस, मेट्रो, लोकल या सेवांसाठी एकच संयुक्त पासच्या घोषणेचा तसेच कोस्टल रोडचा समावेश आहे.नागपुरातपण रस्ते खराबमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी, नागपुरातपण रस्ते खराब आहेत, असा चिमटा काढला. मुंबईतील रस्ते कधी चांगले होतील, या प्रश्नात ते खोचकपणे म्हणाले की, ‘अच्छे दिन’ येण्याआधी नक्कीच रस्ते चांगले करू.’