शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्ग खचला

By admin | Updated: June 9, 2016 02:28 IST

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

सिकंदर अनवारे,

दासगाव- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महाड तालुक्यातील दासगांवच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस वसलेल्या नागरिकांच्या रहदारीसाठी महामार्गावर ब्रिटिशकालीन पूल आहे. काही वर्षांपूर्वी दासगांव खिंडीचे रुंदीकरण करण्यात आले. या पुलाचे रुंदीकरण करून बाजूच्या रस्त्यालाही १० फू ट वाढवण्यात आले. मात्र त्यावेळी राष्ट्रीय महामार्गाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणचे निकृष्ट दर्जाचे काम झाले होते. त्यामुळे पुलाचा काही भाग पावसाळ्यात खचला होता. त्या ठिकाणी तात्पुरती मलमपट्टी लावण्यात आली होती. सध्या वाढलेल्या वाहतुकीमुळे गेल्या महिन्याभरापासून पुन्हा एकदा याच ठिकाणी जवळपास दीड फूट राष्ट्रीय महामार्ग खचला आहे. खचलेल्या ठिकाणाहून फक्त १० किमी अंतरावर महामार्गाचे कार्यालय असून महामार्ग प्रशासन अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने येथील नागरिक व प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणात जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे. जानेवारी महिन्यापासून या मार्गावर वाहतूक वाढली आहे. दासगांव खिंड ते बसस्टॉप जवळपास २०० मीटरहून अधिक राष्ट्रीय महामार्गाचा अर्धा भाग एका बाजूने खचत आहे. मुंबई ते गोवा दिशेने जाणारी वाहने वेगाने आल्यानंतर मुंबई दिशेला समोरून येणारी वाहने पाहिल्यानंतर या खचलेल्या भागामुळे तिरकी होवून चालकाचे नियंत्रण सुटत आहे. यामुळे अपघाताची शक्यता आहे. >पुलाचे काही वर्षांपूर्वी रुंदीकरणदासगांव हद्दीतील या पुलाचे काही वर्षांपूर्वी रुंदीकरण करण्यात आले होते. जवळपास ६ ते ७ फूट पूल तसेच या ठिकाणच्या रस्त्याचे देखील रुंदीकरण के लेहोते. सुरुवातीलाच्या पावसात या पुलाच्या शेजारी रुंदीकरण करण्यात आलेला रस्ता व पूल काही प्रमाणात खचला व या ठिकाणी जुना आणि नवीन पुलाचा जोड बरोबर न झाल्याने दोन्ही पुलाच्या मधल्या भागातून उन्हामुळे डांबर विरघळून गळती झाली होती. यामुळे रहदारी करणाऱ्या प्रवाशांना फटका बसून या डांबरामुळे भाजले होते, तर कित्येक नागरिकांचे कपडे खराब झाले होते. राष्ट्रीय महामार्ग प्रशासन अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच या ठिकाणचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.>ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे तेथे जावून पाहणी करतो. आमच्या लेव्हलचे छोटे काम असेल तर लगेच करून घेतले जाईल. मोठे काम असेल तर त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे ताबडतोब पाठवून देण्यात येईल, त्यानंतर आदेशाप्रमाणे काम के ले जाईल.-प्रकाश गायकवाड, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग महाड विभाग.