शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्ग खचला

By admin | Updated: June 9, 2016 03:22 IST

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

सिकंदर अनवारे,

दासगांव- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महाड तालुक्यातील दासगांवच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस वसलेल्या नागरिकांच्या रहदारीसाठी महामार्गावर ब्रिटिशकालीन पूल आहे. काही वर्षांपूर्वी दासगांव खिंडीचे रुंदीकरण करण्यात आले. या पुलाचे रुंदीकरण करून बाजूच्या रस्त्यालाही १० फूट वाढवण्यात आले. मात्र त्यावेळी राष्ट्रीय महामार्गाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणचे निकृष्ट दर्जाचे काम झाले होते. त्यामुळे पुलाचा काही भाग पावसाळ्यात खचला होता. त्या ठिकाणी तात्पुरती मलमपट्टी लावण्यात आली होती. सध्या वाढलेल्या वाहतुकीमुळे गेल्या महिन्याभरापासून पुन्हा एकदा याच ठिकाणी जवळपास दीड फूट राष्ट्रीय महामार्ग खचला आहे. खचलेल्या ठिकाणाहून फक्त १० किमी अंतरावर महामार्गाचे कार्यालय असून महामार्ग प्रशासन अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने येथील नागरिक व प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणात जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे. जानेवारी महिन्यापासून या मार्गावर वाहतूक वाढली आहे. दासगांव खिंड ते बसस्टॉप जवळपास २०० मीटरहून अधिक राष्ट्रीय महामार्गाचा अर्धा भाग एका बाजूने खचत आहे. मुंबई ते गोवा दिशेने जाणारी वाहने वेगाने आल्यानंतर मुंबई दिशेला समोरून येणारी वाहने पाहिल्यानंतर या खचलेल्या भागामुळे तिरकी होवून चालकाचे नियंत्रण सुटत आहे. यामुळे अपघाताची शक्यता आहे. >दुरु स्तीची नागरिकांची मागणी : पावसाळा तोंडावर आला असताना येथे वाढत्या वाहतुकीमुळे रस्ता खचत आहे. या ठिकाणच्या पुलाखालून दासगांवमधील शेकडो नागरिकांची वर्दळ सुरू असते. पुलाशेजारीच ग्रामपंचायत कार्यालय, दवाखाना, पोस्ट आॅफिस आहे, त्याप्रमाणे या रस्त्याकडेला अनेक व्यावसायिक ही व्यवसाय करत आहेत. अशावेळी या ठिकाणचा भाग खचून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तरी या ठिकाणची लवकर दुरुस्ती करण्याची मागणी दासगांव नागरिकांसह वाहनचालक व प्रवाशांकडून होत आहे. >पुलाचे काही वर्षांपूर्वी रुंदीकरणदासगांव हद्दीतील या पुलाचे काही वर्षांपूर्वी रुंदीकरण करण्यात आले होते. जवळपास ६ ते ७ फूट पूल तसेच या ठिकाणच्या रस्त्याचे देखील रुंदीकरण के लेहोते. सुरुवातीलाच्या पावसात या पुलाच्या शेजारी रुंदीकरण करण्यात आलेला रस्ता व पूल काही प्रमाणात खचला व या ठिकाणी जुना आणि नवीन पुलाचा जोड बरोबर न झाल्याने दोन्ही पुलाच्या मधल्या भागातून उन्हामुळे डांबर विरघळून गळती झाली होती. यामुळे रहदारी करणाऱ्या प्रवाशांना फटका बसून या डांबरामुळे भाजले होते, तर कित्येक नागरिकांचे कपडे खराब झाले होते. राष्ट्रीय महामार्ग प्रशासन अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच या ठिकाणचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे तेथे जावून पाहणी करतो. आमच्या लेव्हलचे छोटे काम असेल तर लगेच करून घेतले जाईल. मोठे काम असेल तर त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे ताबडतोब पाठवून देण्यात येईल, त्यानंतर आदेशाप्रमाणे काम के ले जाईल.- प्रकाश गायकवाड, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग महाड विभाग.