शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्ग अद्याप खड्ड्यांतच

By admin | Updated: August 27, 2016 05:06 IST

पळस्पे ते इंदापूर या ८२ किमी अंतराच्या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अपयशी ठरले आहे.

जयंत धुळप,

अलिबाग- गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या ८२ किमी अंतराच्या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अपयशी ठरले आहे. गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी गणेशभक्त या महामार्गावरून कोकणात जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर २९ आॅगस्टपूर्वी या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम तत्काळ करावे, अन्यथा येथून पुढे पळस्पे ते इंदापूर होणारे वाहनांचे अपघात आणि होणारी मानवीहानी यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास जबाबदार धरून कार्यवाही करण्यात येईल, अशी तंबी रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी गेल्या २२ आॅगस्ट रोजी बैठकीत गोवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अभियंता प्रशांत फेंगडे यांना दिली होती. शुक्रवारी चार दिवस उलटले तरी पळस्पे ते इंदापूर टप्प्यातील खड्डे बुजविण्यात प्राधिकरणास यश आलेले नाही. ‘लोकमत’च्या या महामार्गावरील ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी महामार्गाच्या या टप्प्याची पाहणी केली असता, अत्यंत विदारक परिस्थिती समोर आली. महामार्गाच्या पेण ते खारपाडा या टप्प्यात खड्डे भरण्याकरिता वापरण्यात आलेले साहित्य निकृष्ट असल्याचे दिसून आले. पेण ते वडखळ टप्प्यातील महामार्गाची दुरवस्था झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पेण ते वडखळदरम्यान उचेडे येथे भर पावसात डांबरीकरण सुरू होते. वडखळ ते नागोठणेदरम्यान काम पूर्ण झालेले नाही. पडत्या पावसात टाकलेले व रोल केलेले हॉटमिक्स टिकत नाही. रस्त्याची स्थिती बिकट असून, त्यामुळे प्रवास कठीण झाल्याचे पाली कॉलेजचे उप प्राचार्य प्रा. सुधीर पुराणिक यांनी सांगितले. कोलेटीच्या अलीकडे असलेला पूल ते कामत गोविंदा हॉटेलपर्यंतच्या रस्त्याची चाळण झाल्याचे त्यांनी सांगितले. कोलेटी ते नागोठणे मार्गातील भागात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. वडखळ-पेणदरम्यान काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक तर काही ठिकाणी रेडीमिक्स काँक्र ीट टाकले आहे. गणपतीमध्ये कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांना दरवर्षीप्रमाणेच यंदाही खड्ड्यांतूनच मार्ग काढावा लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. >‘महिनाअखेर काम होणार’केवळ साडेचार किमी अंतरातील खड्डे बुजविण्याचे काम बाकी आहे. ते ३० आॅगस्टच्या संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल, असा दावा गोवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अभियंता प्रशांत फेंगडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे. एकनाथ शिंदे करणार पाहणीपालकमंत्री प्रकाश मेहता यांनी २२ आॅगस्ट रोजी स्पष्ट आदेश देऊनही महामार्ग दुरुस्तीबाबत गोवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गेल्या चार दिवसांत कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. त्यातच महामार्ग रुंदीकरण प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेने २९ आॅगस्ट रोजी बेमुदत धरणे आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे शनिवारी पळस्पे (पनवेल) ते इंदापूर या ८२ किमी टप्प्यातील महामार्गाची पाहणी करणार आहेत.