शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

मुंबई-दिघी-दाभोळ सागरी प्रवासी वाहतूक सूरु, भाऊचा धक्का ते दिघी साडेचार तासात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 19:35 IST

मेरिटाईम बोर्डाने भाऊचा धक्का(मुंबई) ते दिघी(रायगड) अशी सागरी प्रवासी वाहतूक बुधवारी नरक चतूर्दशीच्या मुहूर्तावर सुरु करुन कोकणवासीयांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे.

रायगड -  एसटी कर्मचारी संघटनेने मंगळवार पासून पुकारलेल्या संपाच्या पाश्वर्भूमीवर महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने भाऊचा धक्का(मुंबई) ते दिघी(रायगड) अशी सागरी प्रवासी वाहतूक बुधवारी नरक चतूर्दशीच्या मुहूर्तावर सुरु करुन कोकणवासीयांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. बुधवारी दिघी पर्यंत आलेली ही बोट गुरुवारी धक्का(मुंबई) - दिघी(रायगड) आणि पूढे रत्नागीरी जिल्ह्यात दाभोळ पर्यंत सुरु प्रवासी सेवा देणार असून परतीचा प्रवास देखील दाभोळ-दिघी-भाऊचा धक्का असा असेल अशी माहिती मेरिटाईम बोर्डाचे बंदर निरिक्षक अतूल धोत्रे यांनी लोकमत शी बोलताना दिली आहे.

मेरिटाइम बोर्डाने डेल्टा मेरिटाइम अँड इंडस्ट्रीयल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांना एमव्ही रावी आणि एमव्ही शिवम या दोन बोटी आणि विंध्यवासिनी मरिन सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्या एमव्ही केपीएस या बोटीला मुंबई ते दिघी, दिघी ते दाभोळ आणि दाभोळहून दिघीमार्गे मुंबई या मार्गावर चालवण्यासाठी परवानगी दिली आहे. या बोटसेवेचे वेळापत्रक बोर्डाच्या https:// mahammb.maharashtra.gov.in या वेबसाइटवर देण्यात आले आहे. मुंबई ते दिघी या प्रवासासाठी प्रति प्रवासी ३३० रु. आणि मुंबई ते दाभोळसाठी प्रति प्रवासी ६६० रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. प्रवासांना पूर्वकल्पना नसल्याने पहिल्या दिवशी प्रवाशांचा अल्प प्रतिसाद  मिळाला. बुधवारी दोन प्रवाशांनी धक्का(मुंबई) ते दिघी(रायगड) या सागरी प्रवासी सेवेचा लाभ घेतला.गुरुवार पासून प्रवासी संख्येत वाढ होईल अशी माहिती दिघी बंदराचे अधिक्षक अरविंद सोनावणे यांनी दिली.

बुधवारी  केपीएएस ही बोट स. ९ वाजता भाऊचा धक्का येथून निघून दुपारी दीड वाजता दिघीला पोहोचली. गुरुवार दि. १९ ऑक्टोबर रोजी  शिवम ही बोट स. ८ वाजता भाऊचा धक्का येथून निघून दु. १२.३० वाजता दिघीला पोहोचेल. रावी ही बोट स. ९ वाजता भाऊचा धक्कायेथून निघून दु. दीड वाजता दिघीला पोहोचेल, तर दिघीहून दु. २.३० वाजता निघून रा. ७ वाजता मुंबईला पोहोचेल. केपीएस ही बोट स. साडेदहा वाजता भाऊचा धक्काहून निघून दु. ३ वाजता दिघीला पोहोचेल. तर दु. ४ वा. दिघीहून निघून रा. ८.३० वा. मुंबईला पोहोचेल.शुक्रवार दि. २० ऑक्टोबर रोजी एमव्ही रावी बोटीचे मुंबई-दिघीसाठी स. ८ ते दु. १२.३० व दिघी-मुंबईसाठी दु. १.३० ते सायं. ६, केपीएस बोटीचे मुंबई-दिघीसाठी स. ९.३० ते दु. २ व दिघी-मुंबईसाठी दु. ३ ते सायं. ७.३० असे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.