शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-दिल्ली महामार्ग जेएनपीटीपर्यंत वाढविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 06:27 IST

नितीन गडकरी : उत्तरेकडील वाहतुकीचा भार टाळण्यासाठी नवा महामार्ग

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्ग पुढे जेएनपीटीपर्यंत नेण्यात येणार असून हा हरित महामार्गाचे काम येत्या दीड वर्षात पूर्ण होईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. तर, मुंबई-गोवा महामार्ग वर्षभरात खुला होणार असल्याचेही गडकरी म्हणाले.राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या रुंदीकरणासाठी आवश्यक भूसंपादनासह विविध परवान्यांसदर्भात गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. त्या बैठकीनंतर माध्यमांना गडकरी यांनी विविध विकासकामांची माहिती दिली. केंद्र शासनाच्या वार्षिक आराखड्यानुसार राज्यात २,७२७ कोटींच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. आणखी ५ हजार ८०१ कोटी रुपयांची कामे राज्यात होणार आहेत. मुंबई-दिल्ली महामार्गाचे ४० टक्के काम पूर्ण झाले असून यापूर्वीच्या नियोजनानुसार हा मार्ग मुंबईच्या सीमेपर्यंतच प्रस्तावित होता. आता तो वाढवून जेएनपीटीपर्यंत नेला जाणार आहे. या प्रकल्पात भूसंपादनाची रक्कम मोठी असून राज्य सरकारने यातील काही भार उचलावा, अशी आमची मागणी होती. यावर, राज्य सरकारने या महामार्गासाठी लागणाऱ्या सिमेंट आणि पोलादावरचा वस्तू व सेवा कर तसेच कच्च्या मालावरील रॉयल्टी माफ करण्याची तयारी दाखविल्याचे गडकरी यांनी सांगितले. मुंबई-गोवा महामार्गाच्या १८० किलोमीटर लांबीचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. पनवेल-इंदापूर मार्गावर असलेल्या अडचणी सुटल्या आहेत. त्यामुळे या मार्गाचे ७० ते ७५ टक्के काम झाले असून एक वर्षाच्या आत मुंबई-गोवा चौपदरी महामार्ग खुला होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. मोठ्या प्रमाणावरील वाहतुकीमुळे मुंबई आणि पुण्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी सहा हजार कोटी रुपयांचा नवीन मार्ग तयार करण्यात येणार असल्याचेही गडकरी यांनी यावेळी सांगितले. सुरतवरून नाशिक ते अहमदनगर-सोलापूर-हैदराबाद-चेन्नई-बंगळुरू असा हा मार्ग असणार आहे. भूसंपादनाला सुरुवात होत आहे असेही त्यांनी सांगितले

सर्वात सुंदर सिमेंट  काँक्रीटचा मार्गn पंढरपूरपासून आळंदी आणि देहूपर्यंत असलेला संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर सिमेंट काँक्रीटचा मार्ग ठरेल, अशा पद्धतीने बनविला जात आहे. १२ हजार कोटी रुपयांच्या या महामार्गाच्या बाजूला पायी चालण्याची सुविधा असेल  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी