शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई काँग्रेसचे भांडण दिल्लीदरबारी

By admin | Updated: August 22, 2015 01:30 IST

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि माजी अध्यक्ष गुरुदास कामत यांच्यातील शीतयुद्ध थांबवा, असे साकडे प्रदेश काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी थेट काँग्रेसचे

अतुल कुलकर्णी, मुंबईमुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि माजी अध्यक्ष गुरुदास कामत यांच्यातील शीतयुद्ध थांबवा, असे साकडे प्रदेश काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी थेट काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना घातले आहे. आपापसांतल्या भांडणात मुंबईत पक्षच शिल्लक राहणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली असल्याचे समजते.राजीव गांधी पुण्यतिथी दिनाच्या दिवशीच दोन नेत्यांमधली दुफळी उघडपणे पाहायला मिळाली. निरुपम यांनी जाहीर केलेल्या मोटारसायकल रॅलीकडे पूर्णपणे पाठ फिरवत कामत सकाळी जाऊन राजीव गांधींना पुष्पांजली अर्पण करून आले. त्यानंतर एक तासाने निरुपम आणि अन्य आमदार मोटारसायकल रॅलीने तेथे आले. माजी मंत्री नसीम खान यांनीही रॅलीकडे पाठ फिरवली. निरुपम यांनी मुंबई काँग्रेसच्या बॅनरवर केवळ उत्तर भारतीयांचे मेळावे घेणे सुरू केले, याआधी तसे कधीही घडले नव्हते असा दावा एक गट करत असताना कामत गट कामच करू देत नाही, असा आक्षेप निरुपम गटातर्फे घेतला जात आहे. दिल्लीत राहुल गांधींकडे याबाबत चर्चा झाली. मराठी माणूस शिवसेनेसोबत जातो, कोकणातला माणूसदेखील पोटनिवडणुकीत जर नारायण राणे यांच्या सोबत उभा राहिला नाही. त्यामुळे उत्तर भारतीयांचे नेतृत्व कसे स्वीकारणार, असा युक्तीवादही गांधींना ऐकवण्यात आला. गुजराती मतं भाजपाची साथ सोडणार नाहीत, मुस्लीम मतांचे विभाजन करण्यासाठी एमआयएम आहेच. दक्षिण भारतीय मतदार उमेदवार पाहून निर्णय घेईल. तर उत्तर भारतीय मतदार देखील पूर्णत: काँग्रेससोबत नाही. मतदारांची ही फाटाफूट आहे आणि २२७ नगरसेवकांच्या मुंबई महापालिकेत काँग्रेसचे ५२ नगरसेवक असूनही त्यांनी एकत्र येऊन कधी महापालिका दणाणून सोडल्याचे उदाहरण औषधाला सुध्दा नाही. हेच चित्र कायम राहिले तर मुंबई महापालिकेत अवघ्या पंधरा जागा येणे देखील अवघड होऊन बसेल, अशा स्पष्ट शब्दात खा. गांधींना परिस्थिती सांगण्यात आल्याचे समजते. निरुपम यांच्या आधी जनार्दन चांदूरकर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. पण त्यांच्या काळात पक्ष चर्चेत नव्हता, पण त्याआधी कृपाशंकर सिंह अध्यक्षपदी असताना त्यांनी सतत कार्यक्रम घेऊन पक्ष संघटनेत चैतन्य आणले. परंतु त्यांनाही कामत यांनी काम करु दिले नाही. आता निरुपम यांच्या बाबतीतही तेच होत आहे, असा दावा निरुपम समर्थकांचा आहे.मराठी माणूस सेनेसोबत जातो, कोकणातला माणूस पोटनिवडणुकीत नारायण राणे यांच्यासोबत उभा राहिला नाही. त्यामुळे उत्तर भारतीयांचे नेतृत्व कसे स्वीकारणार, असेही गांधींना सांगण्यात आले.माझी लढाई भाजपा-शिवसेनेसोबत आहे. आमच्यात काही मतभेद असतील तर आपापसांत बसवून ते मिटवले पाहिजेत. काही चुकत असेल तर सांगितले पाहिजे. आज आम्ही दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्तेच्या बाहेर फेकले गेलो आहोत याची जाणीव ठेवून सगळ्यांनी झोकून देऊन काम केले पाहिजे. पण कोणी त्यात व्यक्तिगत स्वार्थाला महत्त्व देत असेल तर त्याला मी काय करणार?- संजय निरुपम, मुंबई काँग्रेस अध्यक्ष