पुणे : शिवसेनेच्या चित्रपट सेनेने विरोध केल्यानंतर पाकिस्तानी गायक गुलाम अली यांचा पुण्यातील शनिवारचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. मुंबईतील पलाश मिडियाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संयोजनाची जबाबदारी पुण्यातील गिरीश शिंदे यांच्यावर होती. त्यास शिवसेना चित्रपटसेनेतर्फे विरोध करण्यात आला होता. गुलाम अली यांच्या कार्यक्रमाबद्दलचा प्रश्न गृह विभागाशी निगडीत आहे. कायदा सुव्यवस्थेचा विचार करून या कार्यक्रमासंदर्भात गृह विभागाने आपली भूमिका मांडली आहे, असे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
मुंबईनंतर पुण्यातील कार्यक्रमही रद्द
By admin | Updated: October 9, 2015 02:28 IST