शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-अहमदाबाद हाय वे जॅम

By admin | Updated: August 1, 2016 02:57 IST

मुंबई-अहमदाबाद हायवेवर चिंंचोटी नजिक काठीयावाडी ढाबा परिसरात पाणी तुंबून राहिल्याने मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली

वसई : मुंबई-अहमदाबाद हायवेवर चिंंचोटी नजिक काठीयावाडी ढाबा परिसरात पाणी तुंबून राहिल्याने मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शनिवारपासून हा प्रकार सुरु झाल्याने वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.गेल दोन दिवसांपासून वसईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्याचा फटका हायवेला बसू लागला आहे. पहिल्यांदाच हायवेवर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर शनिवारपासून पाणी जमा झाल्याने ही कोंडी झाली. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक चिंंचोटी-कामण- भिवंडी ठाणे-मुंबई अशी वळवण्यात आली. तर गुजरातकडे जाणारी वाहतूक मुंबई-फाऊंटन हॉटेल उजवे वळण-घोडबंदर रोड-ठाणे-भिवंडी-कामण-चिंंचोटी या मार्गावरून वळवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)सतत पडत असलेल्या पावसामुळे थंडी वाढल्याने मनोर परिसरात ताप, खोकला, सर्दीची साथ पसरल्याने दवाखाने हाऊसफुल्ल झाले असन त्यात लहान मुलांचे प्रमाण प्रचंड आहे.मनोर, टेण, नांदगाव, पोळे, हलोली, दहिसर, सावरे, येम्बूर, दुर्वेस, पोचडे अशा अनेक गावांत ही साथ पसरली आहे. परिसरातील आश्रम शाळेतील मुलानांही तिची बाधा झाली असून त्यांनाही उपचारासाठी मनोरच्या ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)>वसईला पावसाने झोडपले, जनजीवन विस्कळीतवसईत पावसाने जोरदार हजेरी लावल्याचा जोरदार फटका स्थानिकांना बसला. शिरसाड येथे लोखंडाने भरलेला ट्रक पलटी झाल्याने माहामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. तसेच अंबाडी शिरसाड मार्गावरील उसगाव येथे जोरदार पावसामुळे झाड पडल्याने या ठिकाणी वाहनांच्या रांगा पाच किमी पर्यंत लागल्या होत्या. तसेच भाताणे, मेढे पूल पाण्याखाली गेल्याने १५ गावांचा संपर्क तुटला.>आता थांबण्यासाठी साकडेसतत तीन दिवसापासून बरसत असलेल्या वरुणराजामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नद्या, नाले रस्ते पाण्याने भरून गेले आहेत. शेतकऱ्यांनी केलेल्या आवण्याही सततच्या पावसामुळे निष्फळ ठरून शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आता वरुणराजाला विश्रांती घे रे बाबा, अशी विनवणी करीत आहेत.