शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

दहावीत मुंबईतील दोघांना ९९ टक्के

By admin | Updated: June 4, 2017 01:35 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) १०वी परीक्षेचा आॅनलाइन निकाल शनिवारी दुपारी जाहीर करण्यात आला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी उत्तीर्णतेचे प्रमाण

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) १०वी परीक्षेचा आॅनलाइन निकाल शनिवारी दुपारी जाहीर करण्यात आला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी उत्तीर्णतेचे प्रमाण सुमारे पाच टक्क्यांनी घटले असून, दिल्ली भागात तर ही घट १३.६७ टक्के आहे. चेन्नई विभागाचा निकाल हा ९९.६२ टक्के लागला आहे. जळगावच्या आयुषी राजेंद्र पायघन या विद्यार्थिनीने सर्वाधिक ९९.६० टक्के गुण मिळविले आहेत. तर मुंबईतील दोघांना ९९ टक्के मिळाले.सीबीएसईतर्फे बोर्डाची परीक्षा ९ मार्च ते १० एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती, तर शाळेतील विद्यार्थ्यांची परीक्षा १५ मार्चपासून घेण्यात आली होती. सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेत एकूण ९०.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर त्रिवेंद्रम विभागातून सर्वाधिक म्हणजे ९९.८५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई विभाग आहे. या विभागातून ९९.६२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. चेन्नई विभागातून शाळेतून एकूण २३ हजार ३८९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २३ हजार ३३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बोर्डातर्फे परीक्षेला १ लाख ५४ हजार ८६९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १ लाख ५४ हजार ४४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. खासगीरीत्या २१० विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यातील फक्त ७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाचाटक्का घसरलागेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी उत्तीर्णतेचे प्रमाण सुमारे पाच टक्क्यांनी घटले असून, दिल्ली भागात तर ही घट १३.६७ टक्के आहे. चेन्नई विभागाचा निकाल हा ९९.६२ टक्के लागला आहे. जळगावच्या आयुषी राजेंद्र पायघन या विद्यार्थिनीने सर्वाधिक ९९.६० टक्के गुण मिळविले आहेत.अभ्यासाचा एकच मंत्र आहे, तुम्ही समाधानी असाल तर तुमचा अभ्यास झाला आहे. मी असाच अभ्यास केला. मी खूप ताण घेऊन वर्षभरात कधीच अभ्यास केला नाही. एका दिवसात एका विषयाचा अभ्यास करायचे. अभ्यासातून वेळ काढून बाहेर जाऊन खेळायचे. मला डॉक्टर व्हायचे आहे. त्यामुळे आता ‘नीट’चा अभ्यास सुरू करणार आहे. मला बालरोगतज्ज्ञ व्हायचे आहे. - नीर सावला, ९९.२ टक्के वर्षभरात मी अभ्यासाचा ताण घेतला नव्हता. त्यामुळेच हे शक्य झाले. पाठ्यपुस्तकांचा पूर्ण अभ्यास केला होता. मला इंजिनीअरिंग करायचे आहे. पण मी आयआयटीमध्ये जाणार नाही. कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा याबद्दल विचार सुरू आहे. - आयुष शहा, ९९.४ टक्के अलाहाबाद, चेन्नई, दिल्ली, देहरादून आणि थिरुअनंतपुरम विभागांचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला असून उर्वरित विभागांचा निकाल नंतर जाहीर केला जाईल, असे सीबीएसईने आपल्या वेबसाईटवर म्हटले आहे. एकूण ९०.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालात मुलांनी बाजी मारली असून मुलींपेक्षा मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ०.९ टक्के इतके अधिक आहे. त्रिवेंद्रम विभागातून सर्वाधिक म्हणजे ९९.८५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई विभाग आहे.जळगावातील रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलच्या आयुषी राजेंद्र पायघन या विद्यार्थिनीने ५०० पैकी सर्वाधिक ४९८ (९९.६० टक्के) गुण मिळविले आहेत. संस्कृत व विज्ञान दोनच विषयात तिला ९९ तर इतर सर्व विषयात १०० गुण मिळाले आहेत.सोलापूरच्या इंडियन मॉडेल स्कूलचा विद्यार्थी विनीत डोके याने ५०० पैकी ४९७ गुण (९९़४ टक्के) मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे़ त्याच्या या यशामुळे त्याचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. हे यश पुढेही कायम राखण्याचे आव्हान आता सर्व गुणवंतंसमोर आहे.