शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

मुंबईत २,२६७ तर ठाण्यात ८0५ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: February 8, 2017 04:58 IST

मुंबई महापालिका निवडणुकीतील २२७ जागांसाठी एकूण २ हजार २६७ उमेदवार रिंगणात आहेत. मंगळवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ३६७ जणांनी आपले अर्ज मागे घेतले

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीतील २२७ जागांसाठी एकूण २ हजार २६७ उमेदवार रिंगणात आहेत. मंगळवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ३६७ जणांनी आपले अर्ज मागे घेतले. तर शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि समाजवादी पक्षासह मोठ्या प्रमाणावर अपक्षांनी अर्ज दाखल केल्याने बहुतेक प्रभागांमध्ये बहुरंगी लढत आहे. ठाण्यात ३३ प्रभागांतील १३१ जागांसाठी ८०५ उमेदवार तर उल्हासनगरात ७८ जागेसाठी ४७९ उमेदवार उभे ठाकले असून बहुतेक वॉर्डात तिरंगी अथवा चौरंगी लढती अपेक्षित आहेत.एकीकडे सर्वच प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांनी अर्ज भरले असले तरी मुंबईतील तीन प्रभागांमध्ये मात्र उलट स्थिती आहे. प्रभाग क्रमांक १०० आणि १५८ मध्ये शिवसेना, भाजपा आणि कॉंग्रेस अशा तीनच पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत तर १२६ मध्ये शिवसेना, मनसे आणि भाजपा अशी तिहेरी लढत आहे. या तीन ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. तर १० प्रभागांमध्ये चौरंगी लढत आहे. याशिवाय प्रभाग ५, ६, ९, २१, २७, ३२, ४६, ५९, ६७, ९९, १८६, १९०, २१७, २१८, २१९ आणि २२४ या सोळा ठिकाणी चौरंगी लढत होणार आहे. ठाण्यात विद्यमान ९८ नगरसेवकांचा उमेदवारांमध्ये समावेश असून शेवटच्या दिवसापर्यंत ५५ उमेदवारांचे अर्ज बाद झाले असून तब्बल २८८ बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामध्ये शिवसेना आणि भाजापमधील अधिक बंडखोरांचा समावेश आहे. आता बुधवारपासून खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुराळा उडणार असून, तब्बल २५ वर्षाच्या मैत्रीनंतर ठाण्यात प्रथमच शिवसेना विरुद्ध भाजपा आणि शिवसेना विरुद्ध आघाडी आणि मनसे असा चौरंगी सामना ठाण्यात रंगणार आहे. येत्या २१ फेबु्रवारी रोजी ठाणे महापालिकेची निवडणूक होणार आहे. ३३ प्रभागातून १३१ नगरसेवक हे पालिकेत निवडून जाणार आहेत. यामध्ये ६६ महिलांचा समावेश असणार आहे. प्रभाग क्रमांक तीन मधून काँग्रेसमधून भाजपात डेरेदाखल झालेले जयनाथ पूर्णेकर यांनी अखेरच्या क्षणी निवडणुकीतून माघार घेतली आहे. (प्रतिनिधी)