शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई १६ अंशांवर, दिल्ली ५, अहमदनगर ७ आणि मुंबई १६ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 05:14 IST

उत्तर भारतात पडलेल्या कडाक्याच्या थंडीदरम्यानच महाराष्ट्रही थंडीने गारठून गेला आहे. विशेष म्हणजे उत्तर भारत दाट धुक्यात हरविला असतानाच गुरुवारी दिल्लीचे किमान तापमान ५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.

मुंबई  - उत्तर भारतात पडलेल्या कडाक्याच्या थंडीदरम्यानच महाराष्ट्रही थंडीने गारठून गेला आहे. विशेष म्हणजे उत्तर भारत दाट धुक्यात हरविला असतानाच गुरुवारी दिल्लीचे किमान तापमान ५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. तर अहमदनगरचे किमान तापमान ७ अंश नोंदविण्यात आले. मुंबईचे (सांताक्रुझ वेधशाळा) किमान तापमान १६.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. घटत्या किमान तापमानामुळे गारवा वाढतच असून, पडलेल्या थंडीने मुंबईकर आता चांगलेच गारठले आहेत.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. दुसरीकडे मुंबईच्या किमान तापमानात मागील तीन दिवसांपासून घट नोंदविण्यात येत आहे. मुंबईचे किमान तापमान सोमवारी १४, मंगळवारी १५ आणि गुरुवारी १६ अंश नोंदविण्यात आले आहे. विशेषत: सकाळी आणि सायंकाळी वाहणारे गार वारे मुंबईच्या थंडीत भर घालत आहेत. येत्या ४८ तासांसाठी किमान तापमान १६ अंशावर स्थिर राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. परिणामी वाढती थंडी मुंबईकरांना आणखी हुडहुडी भरविणार आहे.राज्यात सर्वांत कमी किमान तापमान अहमदनगर येथे ७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.५ ते ६ जानेवारीदरम्यान विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.५ आणि ६ जानेवारी - किमान तापमान १६ अंशाच्या आसपास राहील. आकाश मुख्यत: निरभ्र राहील. पहाटेच्या वेळी धुके पडण्याची शक्यता आहे.राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमानअंश सेल्सिअसमध्येमुंबई १६.४, अहमदनगर ७, पुणे १२.१, जळगाव ९.४, कोल्हापूर १६.८, महाबळेश्वर १४, मालेगाव १२, नाशिक ९.३, सांगली १४.७, सातारा १२.७, सोलापूर १४.९, औरंगाबाद १२, परभणी १२.४, नांदेड १३, अकोला ११.१, अमरावती १२.६, बुलढाणा १३.३, चंद्रपूर १०.७, गोंदिया ७.२, नागपूर ८.२, वाशिम ११.४, वर्धा १०.६, यवतमाळ १०

टॅग्स :MumbaiमुंबईNatureनिसर्ग