शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

‘मुळा-प्रवरा’ला न्यायालयात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2016 03:40 IST

मुळा-प्रवरा वीज सहकारी संस्थेच्या मालमत्ता वापरापोटी महावितरण कंपनीने द्यावयाच्या रकमेबाबतची न्यायालयीन लढाई संस्थेने सर्वोच्च न्यायालयात जिंकली.

श्रीरामपूर (अहमदनगर) : मुळा-प्रवरा वीज सहकारी संस्थेच्या मालमत्ता वापरापोटी महावितरण कंपनीने द्यावयाच्या रकमेबाबतची न्यायालयीन लढाई संस्थेने सर्वोच्च न्यायालयात जिंकली. स्वेच्छा सेवानिवृत्तीपोटी कर्मचाऱ्यांना ५६ कोटी रुपये आठवडाभरात मिळणार असल्याची माहिती विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. संस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी यापुढे न्यायालयीन लढाई सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले. गेल्या पाच वर्षांच्या संस्थेच्या मालमत्ता वापरापोटी महावितरण कंपनीने दरमहा १ कोटी रुपये भाडे देण्याचा आदेश यापूर्वीच राज्य वीज नियामक आयोगाने दिला होता. त्याविरोधात महावितरणने केंद्रीय वीज अपील न्यायाधीकरण व सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. मे २०१६पासून महावितरणने मालमत्ता वापरापोटी देय असलेल्या ४.२५ कोटी रुपयांपैकी संस्थेस दरमहा १ कोटी रुपये अदा करून उर्वरित रक्कम आयोगाकडे जमा करण्याचे आदेशात म्हटले आहे. न्यायाधीकरण व आयोगाच्या आदेशास स्थगिती देण्यास तसेच संस्थेकडील आर्थिक असंतुलनाच्या २३०० कोटी रुपयांमधून मालमत्ता वापरापोटी देय असलेली रक्कम महावितरणला समायोजित करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. संस्थेस महावितरणकडून पाच वर्षांचे ३११ कोटी व त्यावरील व्याजापोटी ११३ असे एकूण ४२४ कोटी रुपये येणे आहे. मे २०१६पासून महावितरणने देय असलेल्या ४.२५ कोटी रुपयांपैकी संस्थेस दरमहा १ कोटी रुपये अदा करून उर्वरित रक्कम आयोगाकडे जमा करण्याचे आदेशात म्हटले आहे.