शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले समग्र ग्रंथाचे होणार पुनर्प्रकाशन, १२ वर्षांनी मिळाला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 04:46 IST

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या समग्र साहित्याच्या पुर्नप्रकाशनाला अखेर तब्बल बारा वर्षांनंतर मुहूर्त मिळाला आहे.

पुणे : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या समग्र साहित्याच्या पुर्नप्रकाशनाला अखेर तब्बल बारा वर्षांनंतर मुहूर्त मिळाला आहे. दोनशे पानांच्या नवीन मजकुरासह ११ एप्रिल रोजी महात्मा फुलेंच्या जयंतीदिनी या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.राज्य शासनाने यापूर्वी महात्मा फुले गौरव ग्रंथ, महात्मा फुले समग्र वाङ्मय, शेतकऱ्यांचा आसूड अशी अनेक पुस्तके प्रकाशित केली होती. मोठ्या प्रमाणात मागणी असूनही या ग्रंथांचे पुर्नप्रकाशन करण्यात आले नाही. यासाठी युवा माळी संघटना आणि भिडे वाडा बचाव मोहिमेच्या वतीने राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावाही करण्यात आला होता.महात्मा फुले ग्रंथ प्रकाशन समितीचे प्रमुख, ज्येष्ठ विचारवंत हरी नरके म्हणाले की, सुरूवातीच्या काळात राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने महात्मा फुले यांच्यावरील पुस्तके प्रकाशित केली होती. १९९१ मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती. पुढे २००६ मध्ये दुसरी आवृत्ती आली. त्यानंतर राज्य साहित्य व संस्कृती मंडळाकडून महात्मा फुले प्रकाशन समितीने हे काम स्वत:कडे मागून घेतले. त्यामध्ये नव्याने काही गोष्टी आम्हाला समाविष्ट कराव्याशा वाटल्या. महात्मा फुले यांचे लेखन मोडी लिपीत असायचे. ‘शेतकºयांचे आसूड’ चे मूळ हस्तलिखित मोडीमध्येच होते. महात्मा फुले समग्र ग्रंथासह त्यांची पुस्तके देवनागरी लिपीमध्ये प्रकाशित झाली. आता महात्मा फुले समग्र ग्रंथ नव्याने प्रकाशित करताना २०० पानी मजकूर वाढविण्यात आला आहे. महात्मा फुले यांनी गव्हर्नर जनरलला लिहिलेली मूळ पत्रे छापण्यात आली आहेत. महात्मा फुले हयात असताना जे ग्रंथ प्रकाशित झाले होते त्या ग्रंथाला कुणाकुणाच्या प्रस्तावना होत्या त्यांचा समावेश यात केला आहे. वृत्तपत्रात महात्मा फुले यांनी जे रिपोर्ट लिहिले होते, त्याचाही उल्लेख आहे. महात्मा फुले यांच्या मुलाने लिहिलेले चरित्र, फुलेंचा सयाजीराव गायकवाडांशी पत्रव्यवहार या गोष्टींचा समावेश यामध्ये आहे.