शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

मुदब्बीर शेख हा इसिसचा भारतातील म्होरक्या

By admin | Updated: January 23, 2016 04:02 IST

मुंब्रा येथून एनआयच्या (राष्ट्रीय तपास यंत्रणा)यांनी ताब्यात घेतलेला मुदब्बीर मुश्ताक शेख (३२) हा ‘इसिस’चा भारतामधील मुख्य कमांडिंग अधिकारी होता.

जितेंद्र कालेकर,  ठाणेमुंब्रा येथून एनआयच्या (राष्ट्रीय तपास यंत्रणा)यांनी ताब्यात घेतलेला मुदब्बीर मुश्ताक शेख (३२) हा ‘इसिस’चा भारतामधील मुख्य कमांडिंग अधिकारी होता. अनेक गोरगरीब तरुणांना इसिसच्या जाळ्यात ओढण्याची व त्यांना इसिसपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तो पार पाडत होता, अशी माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.अमृतनगरच्या ‘रेश्मा अपार्टमेंट’मध्ये राहणाऱ्या मुदब्बीरचे शिक्षण ‘बीकॉम’पर्यंत झाले होते. वर्षभरापूर्वी तो एका खासगी कंपनीत कामाला होता. मात्र गेले काही महिने तो बेरोजगार होता. सॉफ्टवेअरची जुजबी माहिती त्याला अवगत असल्यामुळे तो वेबडिझाईनिंगची कामे घ्यायचा. ही कामे करतानाच त्याचा ‘इसिस’शी संपर्क आला. त्यातून तो गेल्या काही दिवसांपासून दिल्ली, हैदराबाद आणि बाहेरच्या देशातील लोकांच्या संपर्कात होता. दिल्लीतून इसिसच्या संपर्कात असलेल्या काही संशयितांबरोबर त्याचा सतत संपर्क होता. त्यांच्याकडून मुदब्बीरचे नाव उघड झाल्यानंतर मुंबई एटीएसच्या ठाणे पथकाने त्याच्यावर गेल्या सहा महिन्यांपासून पाळत ठेवली होती. त्याचे फेसबुक, ईमेल, मोबाइल कॉल्स तसेच त्याच्या राहण्याच्या ठिकाणावर हे पथक सतत पाळत ठेवून होते. सोशल नेटवर्कवरील त्याच्या पोस्ट आणि सोशल मीडियाचा वापर यावर एटीएसचे बारीक लक्ष होते. त्याच्या विरुद्धचे सबळ पुरावे एटीएसला मिळाले होते. मात्र त्याला पकडण्याचा इशारा एनआयएकडून मिळत नव्हता. पठाणकोटच्या हल्ल्यानंतर त्याच्यावरील ‘लक्ष’ अधिक वाढविण्यात आले. तो मुंबई, ठाण्यात होणाऱ्या संभाव्य आत्मघातकी हल्ल्यासाठी तयारीत असल्याची खबर एटीएसने एनआयएकडे पोहोचवल्यावर त्याच्यावर हात टाकण्याचा इशारा झाला.गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजता एनआयए व एटीएसच्या २५ ते ३० जणांच्या पथकाने शेखच्या घराचे दार ठोठावले. पथक पोहोचण्यापूर्वीच तो त्याचे नेटवरील ‘काम’ आटोपून झोपला होता. पथकाने त्याच्या घराच्या घेतलेल्या झडतीत काही आक्षेपार्ह कागदपत्रे, सीडी जप्त करण्यात आल्या. शेखसह त्याच्या घरातील लॅपटॉप, त्याचा व पत्नीचा मोबाइल ताब्यात घेऊन सकाळी ७ वाजता पथक बाहेर पडले. त्याला ताब्यात घेतल्याने त्याच्या पत्नीने बराच गोंधळ घातला. तिच्या आवाजामुळे परिसरातील काही लोक जागेही झाले होते. अतिरिक्त पोलीस महासंचालक विवेक फणसाळकर आणि विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांच्या देखरेखीखाली अत्यंत नियोजनबद्धरीत्या एटीएसने ही मोहीम यशस्वी केली. त्याच्याकडून कोणती कागदपत्रे व माहिती मिळाली ते सांगण्यास एटीएसने असमर्थता दर्शविली आहे. ‘इसिस’मध्ये तरुणांच्या भरतीची होती जबाबदारी ‘इसिस’ या अतिरेकी संघटनेशी निकटचा संबंध असलेला मुदब्बीर हा ठाणे जिल्ह्यातील पाचवा संशयित ठरला आहे. यापूर्वी कल्याणमधील फसाज शेख, अमन तांडेल, सईम टंकी आणि आरीफ मस्जिद हे चौघे इसिसमध्ये दाखल झाले होते. त्यातील आरीफला परत आणण्यात एनआयएला यश आले असून तो सध्या त्यांच्याच ताब्यात आहे. अन्य तिघे इसिसमध्येच आहेत. मुदब्बीर हा मुंब्रा येथे राहून ‘इसिस’चे देशभरातील जाळे नियंत्रित करीत होता. इसिसचे काम कसे चालते? ते कसे चांगले आहे? याची प्रेरणा देणारी पोस्ट आणि माहिती तो इंटरनेट आणि फेसबुकद्वारे दिल्ली, हैदराबाद, मद्रास, पुणे, नागपूर, कोलकाता अशा इतर शहरांमधील त्याच्या संपर्कातील तरुणांना देत होता. त्यांनी इसिसमध्ये प्रवेश करावा याकरिता तो उद्युक्त करीत होता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.३२१िवाढती लोकसंख्या, बंद पडणाऱ्या उद्योगामुंळे वाढणारी बेकारी, बांगलादेशींची वाढती घुसखोरी, आयटी पार्कचे जाळे यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारी, अतिरेकी कारवाया अन् सायबर क्राइम वाढत असल्याचा कयास आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे जिल्ह्यात झोपडपट्ट्या अन् अनधिकृत बांधकामे वाढत आहेत. बंद पडणाऱ्या उद्योगांमुळे बेकारी वाढत आहे. यामुळे बेकार झालेले तरुण गुन्हेगारीकडे वळत आहेत. तर आयटी पार्कमुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून उच्च शिक्षित तरुण अतिरेकी संघटनांसह सायबर क्राइमकडे वळत आहेत.जल्ह्यात बांगलादेशींची घुसखोरी वाढली आहे. मोलकरणींपासून ते हमालीपर्यंत अन् हॉटेलातील वेटरपर्यंत बांगलादेशी तरुण-तरुणींनी शिरकाव केला आहे. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटसह जिल्ह्यातील विविध बांधकाम प्रकल्पांच्या साईटवर भेट दिल्यास बांगलादेशी किती आहेत, ते किती स्वस्तात काम करतात, त्यांना कोणते व्यापारी, बिल्डर काम देतात, कोणते दलाल रेशनकार्ड, आधार कार्ड बनवून देतात, कोण भाड्याने घर मिळवून देते, याचा उलगडा होऊ शकतो.एपीएमसी मार्केटमध्येही त्यांच्या बायकांची घुसखोरी झाल्याचे पाहावयास मिळते. दिवसा मोलमजुरी अन् रात्री मार्केट आवारात उभ्या असलेल्या रिकाम्या ट्रक-टेम्पोमध्ये अनेक बांगलादेशी महिला देहविक्रयाचा व्यवसाय करीत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. यातूनच गुन्हेगारी आणि अतिरेकी कारवायांचा उगम होत आहे. परंतु, त्याकडे सर्वच यंत्रणा दुर्लक्ष करीत आहेत.