शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एमटीएनएल कर्मचाऱ्यांना ‘दूरसंचार’चे वेध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 05:37 IST

वेतनाचा प्रश्न बनला गंभीर : केंद्र शासनाकडे पुन्हा विलीनीकरण करण्याची मागणी

- खलील गिरकर

मुंबई : महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल)च्या ‘अ’ गटातील अधिकारी असलेल्या व ‘एमटीएनएल’ मध्ये प्रतिनियुक्तीवर असलेल्या वरिष्ठ अधिकाºयांनी दूरसंचार विभागात परत पाठवण्याची मागणी केल्याने गट ब, क व ड गटातील कर्मचारी व अधिकाºयांमधून अशीच मागणी पुढे येऊ लागली आहे. केंद्र सरकारच्या सेवेतून एमटीएनएलमध्ये आल्यानंतर वेतनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने पुन्हा केंद्र सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी केली जात आहे. कर्मचारी व अधिकाºयांना आता केंद्र सरकारच्या सेवेत परत जाण्याचे वेध लागले आहेत.

महानगर टेलिफोन निगम कामगार संघटनेचे सरचिटणीस दिलीप जाधव याबाबत म्हणाले, वरिष्ठ अधिकारी इतकी वर्षे ‘एमटीएनएल’ नफ्यात असताना प्रतिनियुक्तीवर राहिले. मात्र आता वेतनाचा प्रश्न निर्माण झाल्याने ते परत जाण्याची मागणी करत आहेत. ज्या प्रमाणे ते अधिकारी दूरसंचार खात्यातून प्रतिनियुक्तीवर आले आहेत, त्याप्रमाणे सर्वसामान्य कर्मचारी व इतर अधिकाºयांना देखील दूरसंचार खात्यात परत जाण्याचा अधिकार आहे.अधिकारी तुपाशी, कर्मचारी उपाशी१ एप्रिल १९८६ ला एमटीएनएलची स्थापना झाल्यापासून ब, क व ड गटातील अधिकारी, कर्मचारी १ नोव्हेंबर १९९८ ला त्यांचे ‘एमटीएनएल’मध्ये विलीनीकरण होईपर्यंत प्रतिनियुक्तीवर होते. या कर्मचारी व अधिकाºयांना १ जानेवारी २०१७ पासून तिसरा वेतन आयोग लागू झालेला असला तरी अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे त्यांना दुसºया वेतन आयोगानुसारच वेतन मिळत आहे.च्‘एमटीएनएल’ मध्ये प्रतिनियुक्तीवर असलेल्या वरिष्ठ अधिकाºयांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळत आहे. एमटीएनएल मध्ये सध्या असलेले अधिकारी व कर्मचारी मुळचे केंद्र सरकारच्या दूरसंचार खात्यातील असल्याने या भेदभावाबाबत त्यांच्यामध्ये नाराजीचे वातावरण आहे.च्ही परिस्थिती बदलण्याची मागणी केली आता पुढे येऊ लागली आहे. केंद्र सरकारच्या सेवेत रुजू झालेले असताना ‘एमटीएनएल’ मध्ये सरकारने पाठवल्याने आपल्या हक्कांवर गदा येत असल्याची भावना कर्मचाºयांमध्ये तयार होऊ लागली आहे.