शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

एमएसएन-हॅथवेच्या वादात ग्राहकांना त्रास

By admin | Updated: August 27, 2015 02:18 IST

एमएसएन आणि हॅथवे दरम्यानच्यावादामुळे मुंबई आणि देशभरातील अन्य शहारांत ‘एमएसएन’ चॅनल्सचे प्रक्षेपण थांबविण्यात आल्याने ग्राहकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे

मुंबई: एमएसएन आणि हॅथवे दरम्यानच्यावादामुळे मुंबई आणि देशभरातील अन्य शहारांत ‘एमएसएन’ चॅनल्सचे प्रक्षेपण थांबविण्यात आल्याने ग्राहकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. पैशांवरून सोनी चॅनल आणि हॅथवे दरम्यान निर्माण झालेल्या वादामुळे मुंबईसह देशभरातील अनेक भागांतील ग्राहकांना सोनी आणि एमएसएनचे अन्य चॅनल पाहण्यास मिळत नाहीत. हॅथवे आणि एमएसएन दरम्यानचा करार ३१ मार्च २०१५ रोजी संपला आहे. हॅथवेकडून मागच्या सात महिन्यापासून पैसे (१४ कोटीचे शुल्क) मिळाले नाही, असे एमएसनचे म्हणणे आहे; तर हॅथवेने असा दावा केला आहे की, एमएसएन अधिक शुल्क मागत आहे. या वादावर लवकरच तोडगा निघेल, अशी आशा महाराष्ट्रातील केबल आॅपरटेर्सच्या संघटनेने व्यक्त केली आहे. एमएसएनचे म्हणणे आहे की, गेल्या सात महिन्यापासून हॅथवेकडून पैसे मिळालेले नाहीत. हॅथवेकडून काहीच प्रतिसाद न मिळालेल्याने हे प्रकरण सॅटकडे(लवाद) नेण्यात आले. आॅक्टोबरअखेर पैसे चुकते करण्यास हॅथवेला सांगण्यात आले आहे. तोवर एमएसएनने जुलैत हॅथवेला नोटीस जारी करीत ६ आॅगस्टपासून चॅनल्सचे प्रक्षेपण रोखले आहे.आम्ही तोडगा काढण्याच्या दृष्टीने खूप प्रयत्न केले;परंतु, तोडगा निघाला नाही. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला, असे एमएसएनच्या प्रवक्त्याने सांगितले. तर, एमएसएन वाढीव शुल्क मागितले जात असल्याने वाद निर्माण झाला आहे. नवीन करार करण्यासाठी एमएसएन जास्त पैसे मागत आहे. वाढीव शुल्क आम्हांला मान्य नाही, असे हॅथवेच्या प्रवक्त्याने सांगितले.अनेक महिने वाट वाट पाहूनही हॅथवेकडून प्रतिसाद न मिळाल्याने आम्ही लवादाकडे धाव घेऊन हॅथवेला शुल्क अदा करण्यास सांगितले.तरीही पैैसे मिळाले नाहीत. त्यामुळे आम्हाला चॅनल्सचे प्रक्षेपण थांबवावे लागले. १६ जुलै रोजी नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर २१ दिवसांनंतर ६ आॅगस्टपासून चॅनल्सचे प्रक्षेपण रोखण्यात आले, असे एमएसएन कंपनीचे मार्केटिंग प्रमुख मकरंद पालेकर यांनी सांगितले.