शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

गळती न रोखणारे महावितरणचे सात अभियंते निलंबित

By admin | Updated: May 9, 2016 04:26 IST

वीजगळती व थकबाकीसाठी जबाबदार धरून औरंगाबाद परिमंडळातील औरंगाबाद शहर, ग्रामीण आणि जालना जिल्ह्यातील ७ अभियंत्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले.

औरंगाबाद : वीजगळती व थकबाकीसाठी जबाबदार धरून औरंगाबाद परिमंडळातील औरंगाबाद शहर, ग्रामीण आणि जालना जिल्ह्यातील ७ अभियंत्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. औरंगाबाद शहर विभागाचे अधीक्षक अभियंता प्रभाकर निर्मळ यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.महावितरणचे संचालक (संचलन) अभिजित देशपांडे यांनी शनिवारी परिमंडळ कार्यालयात वीजचोरी, गळती आणि थकबाकीच्या वसुलीचा आढावा घेतला. बैठकीतच त्यांनी दोषी अभियंत्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. रात्री वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने उपरोक्त आदेश काढण्यात आले. मुख्य अभियंता सतीश चव्हाण यांनी त्यास दुजोरा दिला. सोमवारी त्याबाबत सविस्तर माहिती देतो, असे त्यांनी सांगितले. सक्तीच्या रजेवर पाठविलेल्या निर्मळ यांची नुकतीच मुख्य अभियंतापदी पदोन्नती झालेली आहे. मात्र अजून ते येथून कार्यमुक्त झालेले नव्हते. मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने व्यवस्थापनाची कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप केला आहे. सोमवारी द्वारसभा घेऊन कारवाईचा निषेध करणार असल्याचे संघटनेने सांगितले. (प्रतिनिधी)मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने महावितरण व्यवस्थापनाने एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप केला आहे. सोमवारी औरंगाबाद परिमंडळ कार्यालयासमोर संघटनेने द्वारसभा आयोजित केली आहे. त्यात व्यवस्थापनाने सर्व मागासवर्गीय अभियंत्यांविरुद्ध कारवाई करून मर्जीतल्या अभियंत्यांना पाठीशी घालण्यात आल्याबद्दल निषेध केला जाणार आहे.अतिरिक्त कार्यकारी अभियंता मेश्राम, सहायक अभियंता रवींद्र मोरे, उपकार्यकारी अभियंता रणधीर खंडागळे, उपअभियंता निर्मळे, उपअभियंता सोनवणे, उपकार्यकारी अभियंता सचिन राऊत आणि सहायक अभियंता नामदेव केंद्रे यांच्यावर कारवाई होणार आहे.