शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदार ग्राहकांविरोधात महावितरणची धडक मोहीम

By admin | Updated: August 7, 2016 19:25 IST

जिल्ह्यात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील १ लाख ४२ हजार १५९ ग्राहकांकडे वीजबिलाची ३४ कोटी ८० लाखांची थकबाकी आहे.

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 7-  जिल्ह्यात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील १ लाख ४२ हजार १५९ ग्राहकांकडे वीजबिलाची ३४ कोटी ८० लाखांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने धडक मोहीम सुरू केली आहे. यात बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यासाठी कार्यकारी अभियंत्यांपासून ते जनमित्रांपर्यंत सर्वांना वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे, अशी माहिती अधीक्षक अभियंता धनंजय औंढेकर यांनी दिली आहे. सोलापूर मंडलात येणाऱ्या अकलूज, पंढरपूर, बार्शी, सोलापूर ग्रामीण व सोलापूर शहर विभागांत घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्यिक वीज वापरासाठीची थकबाकी ३५ कोटींच्या घरात गेली आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी सोलापूर मंडलाने विशेष मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. ज्या ग्राहकांकडे थकबाकी आहे त्यांना थकबाकी भरण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. दिलेल्या मुदतीत बिल न भरल्यास त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. जिल्ह्यात १ लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेले १०७ ग्राहक आहेत. त्यांच्याकडे २ कोटी ७० लाख थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्याची जबाबदारी संबंधित विभागांच्या कार्यकारी अभियंत्यांकडे देण्यात आली आहे. ५० हजारांपेक्षा अधिक थकबाकी असलेले २११ ग्राहक असून, त्यांच्याकडे १ कोटी ४१ लाखांची थकबाकी आहे. ही वसुली करण्याची जबाबदारी संबंधित उपविभागीय अभियंत्यांकडे देण्यात आली आहे. ५ हजार ते ५० हजारांदरम्यान थकबाकी असलेले ११ हजार ४ ग्राहक असून, त्यांच्याकडे ११ कोटी ३७ लाखांची थकबाकी आहे. ही वसुली करण्याची जबाबदारी संबंधित शाखा अभियंत्यांकडे देण्यात आली आहे. ५०० ते ५ हजारांदरम्यान थकबाकी असलेले १ लाख ३० हजार ८३७ ग्राहक असून, त्यांच्याकडे १९ कोटी ३० लाखांची थकबाकी आहे. ही वसुली करण्याची जबाबदारी संबंधित जनमित्रांकडे देण्यात आली आहे. अधीक्षक अभियंता धनंजय औंढेकर नियमितरीत्या या मोहिमेचा आढावा घेणार आहेत. जनमित्र, शाखा अभियंता, उपविभागीय अभियंत्यांसह संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता अशी महावितरणची संपूर्ण यंत्रणा या मोहिमेत सहभागी झाली आहे. त्यामुळे ग्राहकांकडे आपली थकबाकी तातडीने भरून वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. - - - - - - - - - अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा हवा असेल तर ग्राहकांनी आपली बिले नियमित भरणे आवश्यक आहे. नोटिसीची वाट न पाहता थकबाकीदारांनी आपली बिले भरावीत आणि वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळावी. - धनंजय औंढेकर, अधीक्षक अभियंता