शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

MSEBचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रमेश सहस्रबुद्धे यांचे निधन

By admin | Updated: December 28, 2016 21:55 IST

प्रसिद्ध साहित्यिक, विज्ञानकथा लेखक रमेश सहस्रबुद्धे यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 28 - प्रसिद्ध साहित्यिक, विज्ञानकथा लेखक रमेश सहस्रबुद्धे यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. आजवर त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर एकूण 76 पुस्तके लिहिली आहेत. अनेक दिवाळी अंकांमध्ये त्यांनी लेखन केले असून,त्यांनी लिहिलेल्या विज्ञान-कुतुहल, प्राणी-पक्षी निरीक्षण, बोधकथा, वैज्ञानिकांचे आणि थोरांचे किस्से प्रसिद्ध झाले आहेत. "प्रभात'च्या दिवाळी अंकात आणि "प्रभात'ने राबवलेल्या "ऑल राउंडर' या उपक्रमातही त्यांचा सहभाग होता. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे ते राज्यातील पहिले मुख्य जनसंपर्क अधिकारी होते. अनेक वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिकांतून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले असून, आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून देखील त्यांची व्याख्यानमाला प्रदर्शित झाली आहे. टेलिव्हिजन आणि विज्ञानसागरातील दीपस्तंभ या त्यांच्या दोन विज्ञानविषयक पुस्तकांना राज्यपुरस्कार लाभला असून, यातील एकास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या इतर दोन पुस्तकांस बालकुमार साहित्य पुरस्कारही मिळाला आहे. विविध योजनांसाठी त्यांची पुस्तके लागली आहेत. रोहा येथे 1987 मध्ये झालेल्या विज्ञान परिषदेच्या संमेलनात त्यांच्या विज्ञानविषयक लेखन कार्याचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला होता. गोवा पाठ्यपुस्तक मंडळाने आठवीच्या पुस्तकात रमेश सहस्रबुद्धे यांचा धडा समाविष्ट केला अूसन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या टी. वाय. बी. ए.च्या अभ्यासक्रमासाठी त्यांच्या एका लेखाचा समावेश करण्यात आला आहे. मराठी विज्ञान परिषदेमार्फत काढल्या जाणाऱ्या पत्रिका व मासिकाच्या संपादक मंडळात त्यांचा काही काळ समावेश होता. "विज्ञानयुग' या पुण्यात प्रसिद्ध होणाऱ्या मासिकाचे ते अनेक वर्षे सल्लागार मंडळावर होते. निगडीतील ज्येष्ठ नागरिक संघाचे ते अध्यक्ष होते. त्याचबरोबर "ऍस्कॉप' या पुण्यातील ज्येष्ठ नागरिक संघाचे ते तीन वर्षे उपाध्यक्ष होते. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक संघांचा महासंघ "फेस्कॉम'च्या प्रादेशिक विभागाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.